Modak Recipe : कोकणी चवीचे गव्हाच्या पिठाचे मोदक; गौरी-गणपतीला नक्की बनवा, वाचा सोपी रेसिपी

Shreya Maskar

गणेश चतुर्थी

गणेश चतुर्थी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. गौरी-गणपतीला कोकणात बनवतात तसे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवा. सोपी पारंपरिक रेसिपी वाचा.

Ganesh Chaturthi | pinterest

कोकण स्पेशल मोदक

गव्हाच्या पिठाचे मोदकांसाठी पारी बनवण्यासाठी मैदा, गव्हाचे पीठ, रवा, तूप, दूध आणि चवीपुरते मीठ इत्यादी साहित्य लागते.

Konkan Special Modak | pinterest

गव्हाच्या पिठाचे मोदक

तर मोदकांचे सारण बनवण्यासाठी ओलं खोबरं, गुळ, खवा, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट इत्यादी साहित्य लागते.

Wheat Flour Modak | pinterest

ड्रायफ्रूट

गव्हाच्या पिठाचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप गरम करून ड्रायफ्रूट परतून घ्या. त्यानंतर गूळ विरघळेपर्यंत सतत ढवळत रहा.

Dry Fruits | pinterest

ओलं खोबरं

आता मिश्रणात ओलं खोबरं टाकून व्यवस्थित मिक्स करा. मोदकाच्या सारणाची चव आणखी वाढवण्यासाठी त्यात खवा आणि वेलची पावडर घाला.

Fresh Coconut | pinterest

गव्हाचे पीठ

दुसरीकडे एक मोठी परात घ्या. त्यात मैदा. गव्हाचे पीठ, रवा, तूप, दूध आणि चवीनुसार मीठ घालून चांगली कणिक मळून घ्या. पीठ मऊ राहील याची काळजी घ्या.

flour-wheat | pinterest

दूध

तयार पिठाचे छोटे छोटे गोळे करा आणि त्याची पारी तयार करून घ्या. आता पारीत तयार सारण घालून कडेला दूध लावून मोदकाचा आकार द्या.

Milk | pinterest

मोदक तळा

शेवटी पॅनमध्ये तेल गरम करून मोदक गोल्डन फ्राय होईपर्यंत चांगले तळून घ्या. गॅस कमी आचेवर ठेवा. अशा पद्धतीने कोकणात गावाकडे बनवतात अगदी तसे गव्हाच्या पिठाचे मोदक (तळणीचे मोदक) तयार झाले.

Fry the modaks. | pinterest

NEXT : ना डाळ भिजवायची, ना पीठ आंबवायचं! 'या' पदार्थापासून झटपट बनवा कुरकुरीत मेदू वडा

Medu Vada Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...