Medu Vada Recipe : ना डाळ भिजवायची, ना पीठ आंबवायचं! 'या' पदार्थापासून झटपट बनवा कुरकुरीत मेदू वडा

Shreya Maskar

सोयाबीन मेदू वडा

सोयाबीन मेदू वडा बनवण्यासाठी सोयाबीन, उडीद डाळ , हिरवी मिरची, आले, जिरे, काळी मिरी, कोथिंबीर, कढीपत्ता, मीठ, हिंग, तांदळाचे पीठ, पाणी, तेल इत्यादी साहित्य लागते

Soybean marrow vada | pinterest

सोयाबीन

सोयाबीन मेदू वडा बनवण्यासाठी सर्वप्रथम सोयाबीन आणि उडीद डाळ वेगवेगळ्या भांड्यात स्वच्छ धुऊन घ्या. पुरेसे पाणी घालून रात्रभर भिजत ठेवा.

soybeans | pinterest

पाणी

सकाळी भिजलेले सोयाबीन पाण्यातून काढून कुकरमध्ये घ्या. थोडे पाणी घालून साधारण 2–3 शिट्ट्या करून मऊ शिजवून घ्या. त्यानंतर पूर्णपणे पाणी काढून थंड होऊ द्या.

water | pinterest

उडीद डाळ

भिजवलेली उडीद डाळ पाणी न घालता किंवा अगदी थोडे पाणी वापरून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. शिजलेले आणि पूर्ण थंड झालेले सोयाबीनही मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. दोन्ही मिश्रण एकत्र करा.

urad dal | pinterest

हिरवी मिरची-आले पेस्ट

मिश्रणात मीठ, हिरवी मिरची-आले पेस्ट, जिरे, काळी मिरी, हिंग, कोथिंबीर आणि कढीपत्ता घाला. हवे असल्यास तांदळाचे पीठ घाला. पीठ ५ मिनिटे चांगले फेटून घ्या. यामुळे वडे हलके आणि मऊ होण्यास मदत होते.

Green Chilli-Ginger Paste | pinterest

वडे तळा

हात थोडा ओला करून मिश्रणाचा गोळा घ्या. हातावर ठेवून मध्ये छिद्र पाडा आणि मेदू वड्याचा आकार द्या. कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा. तेल खूप तापलेले नसावे. आता मध्यम आचेवर सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत वडे तळा.

Vade | pinterest

वडे कशासोबत टेस्टी लागतात?

गरमागरम आणि कुरकुरीत सोयाबीनचे मेदू वडे नारळाची चटणी, हिरवी चटणी आणि सांबार यांच्यासोबत सर्व्ह करा. सोबत गरमागरम चहा प्या.

What is testy with Vade? | pinterest

परफेक्ट वड्यासाठी टिप्स

कुरकुरीत वडे हवे असल्यास १ टेबलस्पून तांदळाचे पीठ घालू शकता. वाटताना जास्त पाणी घातल्यास पीठ पातळ होऊन वडे तेलात फुटू शकतात.

Tips | pinterest

NEXT : चव अशी की गणरायालाही आवडेल! फक्त १० मिनिटांत बनवा स्वादिष्ट मोदक, १-२ आठवडे राहतील ताजे

Modak Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...