Modak Recipe : चव अशी की गणरायालाही आवडेल! फक्त १० मिनिटांत बनवा स्वादिष्ट मोदक, १-२ आठवडे राहतील ताजे

Shreya Maskar

गणेश चतुर्थी

गणेश चतुर्थीला खास ड्रायफ्रूट मोदक बनवा. हे मोदक जास्त दिवस ताजे राहतात आणि बनवायला देखील सोपे असतात.

Ganesh Chaturthi | pinterest

ड्रायफ्रूट मोदक

ड्रायफ्रूट मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम खजूरच्या बिया काढून लहान तुकड्यांमध्ये कापून घ्या. दुसरीकडे काजू, बदाम आणि पिस्ता बारीक चिरून घ्या.

Dry Fruit Modak | pinterest

खजूर

आता मध्यम आचेवर एक पॅन गरम करा. तिन्ही साहित्य एक एक करून घाला, २-३ मिनिटे भाजून घ्या आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून ठेवा.

dates | pinterest

खसखस

त्याच पॅनमध्ये खसखस घालून २-३ मिनिटे भाजून घ्या. हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून ठेवा. लक्षात ठेवा सर्व पदार्थ भाजताना गॅस मंद आचेवर ठेवा.

poppy seeds | pinterest

मनुका

पुढे, एका पॅनमध्ये तूप गरम करा. नंतर त्यात खजूर आणि मनुका घालून ढवळत २-३ मिनिटे शिजवा. आचेवरून उतरवा, त्यात बदाम, काजू, पिस्ता आणि खसखस घालून चांगले मिसळा.

raisin | pinterest

मोदक रेसिपी

हे मिश्रण थोडे थंड झाल्यावर ते साच्यात भरून मोदक बनवा. अशाप्रकारे फक्त १० मिनिटांत स्वादिष्ट ड्रायफ्रूट मोदक तयार झाले.

Modak recipe | pinterest

ड्रायफ्रूट

ड्रायफ्रूट मोदक बनवण्यासाठी खजूर, ड्रायफ्रूट (मनुका, बदाम, काजू, पिस्ता), खसखस आणि तूप इत्यादी साहित्य लागते.

Dry fruit | pinterest

किती दिवस राहतात जाते?

ड्रायफ्रूट मोदक १-२ आठवडे ताजे राहतात. फक्त ते हवा बंद डब्यात खोलीच्या तापमानावर ठेवा. कारण यात पाणी, दूध किंवा ओल्या नारळाचा वापर होत नाही.

How long does it stay? | pinterest

NEXT :  गणरायाच्या नैवेद्यासाठी ५ मिनिटांत बनवा तळणीचे मोदक, १ सोपी ट्रिक वापरली तर कधीच फुटणार नाहीत

Modak Recipe | pinterest
येथे क्लिक करा...