mi vs csk ms dhoni praised ruturaj gaikwad after match against mumbai indians  twitter
Sports

MI vs CSK, IPL 2024: कर्णधार ऋतुराजकडून एमएस धोनीचं कौतुक ! सामन्यानंतरचा स्पेशल Video सोशल मीडियावर व्हायरल

Ruturaj Gaikwad- MS Dhoni Viral Video: एमएस धोनीला फलंदाजी करताना पाहण्यासाठी क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आयपीएल २०२४ स्पर्धेतील २९ वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला.

Ankush Dhavre

एमएस धोनीला फलंदाजी करताना पाहण्यासाठी क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आयपीएल २०२४ स्पर्धेतील २९ वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना एम धोनीचे विंटेज रुप पाहायला मिळाले. शेवटच्या षटकात धोनी फलंदाजीला आला आणि हार्दिक पंड्याच्या एकाच षटकात त्याने ३ षटकार मारले. दरम्यान या सामन्यानंतर एमएस धोनी आणि ऋतुराज गायकवाडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

एमएस धोनी हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने ५ वेळेस जेतेपदाचा मान मिळवला आहे. दरम्यान आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच एमएस धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. ही जबाबदारी त्याने ऋतुराज गायकवाडकडे सोपवली आहे. मुंबई विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना झाल्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यात धोनी ऋतुराजला आपली पाठ दाखवतो आणि ऋतुराज त्याची पाठ थोपटतो. धोनीचा हा क्यूट व्हिडिओ सोशल मीाडियावर तुफान व्हायरल होतोय.

शेवटच्या षटकात धोनीचा कहर..

एमएस धोनी या सामन्यात २० व्या षटकात फलंदाजी करण्यासाठी आला. यादरम्यान त्याला केवळ ४ चेंडू खेळण्याची संधी मिळाली. त्याने हार्दिक पंड्याच्या षटकातील तिसऱ्या,चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर लागोपाठ ३ षटकार मारले. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर त्याने धावत २ धावा पूर्ण केल्या.

हार्दिक पंड्याच्या या षटकात तब्बल २६ धावा कुटल्या गेल्या. या २६ धावांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने २० षटक अखेर २०६ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून रोहित शर्माने नाबाद १०५ धावांची खेळ केली. मात्र त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. हा सामना मुंबई इंडियन्सने २० धावांनी गमावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: कॉफी पासून बनवलेले हे फेस मास्क लावा; आठवड्याभरात मिळेल क्लिअर स्मूद चेहरा

Sara Tendulkar: अर्जुननंतर सारा तेंडुलकरनं दिली खुशखबर; खास कार्यक्रमातले फोटो व्हायरल

Maharashtra Live News Update: तीन महिन्यात रस्ता उखडला, इसापूर रस्त्याची दुरावस्था

Pune : महाराष्ट्राचा मर्दानी खेळ थेट जर्मनीमध्ये! पुण्यात प्रशिक्षण घेत परदेशी तरुणीने सुरू केले वर्ग

Crime: कॅफेमध्ये मैत्रिणीसोबत बसला होता, टोळक्याकडून अमानुष मारहाण; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT