IPL Orange Cap 2024: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत रोहितची मोठी झेप! टॉप १० मध्ये केवळ १ परदेशी फलंदाज

IPL Orange Cap List 2024: मुंबई इंडियन्स संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने चेन्नईविरुद्ध झालेल्या सामन्यात एकाकी झुंज देत शतकी खेळी केली. यासह त्याने ऑरेंज कॅपच्या यादीत प्रवेश केला आहे.
rohit sharma enters in top 5 of orange cap list know the latest standings
rohit sharma enters in top 5 of orange cap list know the latest standings twitter

मुंबई इंडियन्स संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने चेन्नईविरुद्ध झालेल्या सामन्यात एकाकी झुंज देत शतकी खेळी केली. या शतकी खेळीसह त्याने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मोठी झेप घेतली आहे. या डावात १०५ धावांची खेळी करत त्याने टॉप ५ फलंदाजांच्या यादीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेतील ६ सामन्यांमध्ये त्याने २६१ धावा केल्या आहेत. यासह त्याने विराट कोहली, रियान पराग आणि संजू सॅमसनसारख्या फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

रोहित शर्माची बॅट या हंगामात चांगलीच तळपतेय. त्याने आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये ५२.५० च्या सरासरीने आणि १६७.३१ च्या स्ट्राईक रेटने २६१ धावा चोपल्या आहेत. तो या हंगामात शतकी खेळी करणारा तिसराच फलंदाज ठरला आहे. रोहितने शतक झळकावण्यापूर्वी विराट कोहली आणि जोस बटलरने हा कारनामा करुन दाखवला आहे.

rohit sharma enters in top 5 of orange cap list know the latest standings
MI vs CSK, IPL 2024: लाईव्ह सामन्यात पोलार्ड, टिम डेव्हिड अंपायरसोबत भिडले! नेमकं काय घडलं? -Video

ऑरेंज कॅपच्या यादीत अव्वल स्थानी कोण?

ऑरेंज कॅपच्या यादीत सध्या भारतीय फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील फलंदाज विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराटने आतापर्यंत ३१९ धावा केल्या आहेत. मुख्य बाब म्हणजे उर्वरित कुठल्याही फलंदाजाला ३०० धावांचा आकडा गाठता आलेला नाही. भारताचे दोन्ही स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा हे टॉप ४ फलंदाजांमध्ये आहे. ही भारतीय संघासाठी सकारात्मक बाब आहे.

rohit sharma enters in top 5 of orange cap list know the latest standings
RCB vs SRH, IPL 2024: फलंदाजांची चांदी की गोलंदाजांचा कहर? बंगळुरुची खेळपट्टी कोणाला साथ देणार? वाचा पिच रिपोर्ट

तर मुंबई इंडियन्सविरुद्ध तुफानी अर्धशतकी खेळी करणारा शिवम दुबे या यादीत सहाव्या स्थानी आहे. दुबेने आतापर्यंत २४२ धावा केल्या आहेत. तर कर्णधार ऋतुराज गायकवाड २२४ धावा करत सातव्या पोहोचला आहे. तर २२३ धावा करणारा निकोलस पुरन हा ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असलेला एकमेव परदेशी फलंदाज आहे. तसेच २०४ धावा करणारा केएल राहुल या यादीत दहाव्या स्थानी आहे.

असे आहेत टॉप १० फलंदाज..

विराट कोहली - ३१९ धावा

रियान पराग - २८४ धावा

संजू सॅमसन - २६४ धावा

रोहित शर्मा - २६१ धावा

शुभमन गिल- २५५ धावा

शिवम दुबे- २४२ धावा

साई सुदर्शन - २२६ धावा

निकोलस पुरन- २२३ धावा

केएल राहुल - २०४ धावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com