MI VS CSK IPL 2025 x
Sports

MI विरुद्धच्या सामन्यात CSK ने मुंबईचा खेळाडू मैदानात उतरवला, जाणून घ्या कोण आहे आयुष म्हात्रे?

MI VS CSK IPL 2025 : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हा सामना वानखेडेवर रंगणार आहे. टॉस जिंकून हार्दिक पंड्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता चेन्नईचे खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहेत.

Yash Shirke

MI VS CSK : वानखेडे स्टेडियमवर आज आयपीएलमधील एल क्लासिकोचा थरार पाहायला मिळणार आहे. पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकणारे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे बलाढ्य संघ आमनेसामने आले आहेत. सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याची निर्णय घेतला आहे. वानखेडे स्टेडियमवर कोण जिंकणार याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी मुंबईच्या आयुष म्हात्रेला चेन्नई सुपर किंग्सने आजच्या महामुकाबल्यामध्ये खेळण्याची संधी दिली आहे. खराब खेळीमुळे राहुल त्रिपाठीला प्लेईंग ११ मधून वगळण्यात आले आहे. त्रिपाठीच्या जागी आयुष म्हात्रे खेळणार आहे. हा चेन्नईच्या संघातील एकमेव बदल आहे. दुसऱ्या बाजूला मुंबईने प्लेईंग ११ मध्ये एकही बदल केलेला नाही.

कोण आहे आयुष म्हात्रे?

आयुष म्हात्रेने ऑक्टोबरमध्ये आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात फर्स्ट क्लास सामन्यांतून केली. त्याने आतापर्यंत मुंबईसाठी ९ फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. या १६ डावांत त्याने २ शतकं आणि १ अर्धशतक झळकावत एकूण ५०४ धावा केल्या आहेत. लिस्ट ए प्रकारातही त्याने चांगली कामगिरी केली आहे. ७ सामन्यांत त्याने २ शतकांसह ४५८ धावा केल्या आहेत. फलंदाजीसोबत आयुष गोलंदाजीही करतो. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ४ डावांत ११.२८ च्या सरासरीने ७ विकेट्स घेतल्या आहेत.

मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -

हार्दिक पंड्या (कर्णधार), रायन रिकल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ड, जसप्रीत बुमराह, अश्वनी कुमार

चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग ११ -

एमएस धोनी (कर्णधार), शेख रशीद, रचिन रवींद्र, आयुष म्हात्रे, विजय शंकर, जेमी ओवर्टन, रवींद्र जडेजा, खलील अहमद, नूर अहमद, अंशुल कम्बोज, मथीश पाथिराना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचं आंदोलन

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

SCROLL FOR NEXT