shubman gill catch twitter
क्रीडा

Shubman Gill Catch: कुसल मेंडिस आऊट नव्हता? गिलचा तो फोटो होतोय व्हायरल

Shubman Gill Catch Controversy: भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने झेल टिपला होता. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमधील तिसऱ्या वनडे सामन्याचा थरार कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात शुभमन गिलने सीमारेषेवर भन्नाट झेल टिपला. या भन्नाट झेलच्या बळावर त्याने कुसल मेंडीसला बाद करत माघारी धाडलं. अंपायरने बाद घोषित केल्यानंतर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय ज्यात कुसल मेंडीस बाद नसल्याचं दिसून येत आहे.

भारतीय संघावर चिटिंगचा आरोप

तर झाले असे की, या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात श्रीलंकेला चांगली सुरुवात मिळाली होती. शेवटी कुसल मेंडीसने आक्रमक फलंदाजी करत शेवटही चांगला केला. कुसल मेंडीसने अर्धशतकी खेळी करत श्रीलंकेला मजबूत स्थितीत पोहोचवलं. दरम्यान ४९ व्या षटकात गिलने त्याचा शानदार झेल टिपला आणि त्याला बाद करत माघारी धाडलं.

या सामन्यातील ४९ वे षटक टाकण्यासाठी कुलदीप यादव गोलंदाजीला आला होता. त्यावेळी कुसल मेंडीस फलंदाजी करत होता. कुलदीप यादवच्या षटकातील चौथ्या चेंडूवर मेंडीसने लेग साईडच्या दिशेने मोठा फटका मारला. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात होता. त्यावेळी गिलने सीमारेषेवर उडी मारत शानदार झेल टिपला.

गिलने आधी उडी मारत चेंडू हवेत उडवला त्यानंतर तो सीमारेषेबाहेर गेला आणि पुन्हा आत येऊन झेल टिपला. हा झेल टिपल्यानंतर गिलला पूर्ण विश्वास होता. अंपायरने तिसऱ्या अंपायरकडे इशारा केला. त्यावेळी डीआरएसमध्ये तो बाद असल्याचं दिसून आलं. मात्र सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात गिलचा पाय सीमारेषेला स्पर्श झाल्याचं दिसून येत आहे. या व्हिडिओवरुन नेटकरी भारतीय संघावर चीटिंग केल्याचा आरोप करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT