sri lanka cricket team twitter
Sports

Virat Kohli Viral Video: इतका राग बरा नव्हं...कुसल मेंडिसने रागात विराट समोरच आपटलं हेल्मेट; नेमकं काय घडलं?- VIDEO

Kusal Mendis Threw Helmet: श्रीलंकेचा यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिसने विराट कोहलीसमोरच हेल्मेट फेकलं, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमधील वनडे मालिकेतील दुसरा सामना कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २४० धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीला १४ धावा करता आल्या. दरम्यान विराट कोहलीने रिव्ह्यू घेतल्यानंतर श्रीलंकेचा यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिस रागात हेल्मेट आपटताना दिसून आला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियार व्हायरल होतोय.

तर झाले असे की, रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजीला आला होता. विराटने या डावात चांगली सुरुवात केली. मात्र त्याला या खेळीचं रुपांतर मोठ्या खेळीत करता आलं नाही.

या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजाने विराटला पायचित बाद केलं होतं. गोलंदाजाने अपील केली आणि अंपायरने बोट दाखवलं. मात्र विराटने क्षणही न दवडता डीआरएसची मागणी केली. डीआरएसमध्ये दिसलं की, चेंडू पॅडला लागण्याच्या आधी बॅटला लागला होता. त्यामुळे विराट नॉट आऊट राहिला. तिसऱ्या अंपायरने विराटला नॉट आऊट घोषित करताच, यष्टीरक्षक कुसल मेंडिसने रागात हेल्मेट आपटलं. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

भारताचा पराभव

या सामन्यात भारतीय संघाला जिंकण्यासाठी २४१ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने चांगली सुरुवात करुन दिली होती. रोहित आणि शुभमन गिलने मिळून ९७ धावा जोडल्या. मात्र रोहित बाद झाल्यानंतर इतर खेळपट्टीवर टिचून फलंदाजी करता आली नाही. शुभमन गिल ३५, विराट कोहली १४, शिवम दुबे ०,अक्षर पटेल ४४, श्रेयस अय्यर ७ आणि केएल राहुल शून्यावर माघारी परतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ajit Pawar : 'सोनं स्त्रियांनाच शोभून दिसतं'; पुण्यातल्या गोल्डमॅनना अजितदादांच्या कानपिचक्या, VIDEO

Pune Airport : पुण्यात एअर इंडियाच्या विमानात बिघाड? प्रवाशांना मनस्ताप, VIDEO

Bhandup Railway Station : मध्य रेल्वेवरील स्थानकावर अचानक बत्ती गुल; नेमकं काय घडलं? VIDEO

Health Tips: चपाती आणि भात खाल्ल्याने वजन वाढते का?

SCROLL FOR NEXT