भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल सध्या संघाबाहेर आहे. फिटनेसच्या समस्येतून संघाबाहेर पडलेला केएल राहुल सध्या मेडिकल टीमच्या देखरेखीखाली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यानंतर त्याला दुखापतीमुळे दरम्यान मैदान सोडावं लागलं होतं. याच दुखापतीवर उपचार घेण्यासाठी तो लंडनला गेला होता. आता तो लंडनहून परतला आहे.
आयपीएल खेळणार का?
केएल राहुल लंडनहून तर परतला आहे. मात्र तो आयपीएल खेळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान केएल राहुलच्या एका सुत्राने आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ' केएल राहुल सध्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेसाठी NCA मध्ये आहे. इथे असताना तो आपली फिटनेस पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.' केएल राहुल आयपीएल स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्स संघाचं नेतृत्व करतो. (Cricket news in marathi)
'दुखापत गंभीर नव्हती. मात्र तो १०० टक्के फिट नव्हता . असं असलं तरी त्याला कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये. त्यामुळेच त्याने इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तो चेकअप करण्यासाठी लंडनला गेला होता. मात्र आता तो पूर्णपणे फिट आहे.' असं सुत्राने आयएएनएसला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
येत्या २२ मार्चपासून आयपीएल २०२४ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. तर लखनऊ सुपर जायंट्स संघाचा पहिला सामना २४ मार्च रोजी रंगणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध असणार आहे. तर पुढील सामना ३० मार्च रोजी पंजाब किंग्जविरुद्ध आणि २ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरुद्ध रंगणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.