Ms Dhoni: नवा सीझन, नवी भूमिका! IPL सुरू होण्याआधीचं धोनी धक्का देणार; एका पोस्टने चाहत्यांची धडधड वाढली

Ms Dhoni Latest News: एकीकडे चाहत्यांना आयपीएलची उत्सुकता असतानाच महेंद्रसिंग धोनीच्या एका पोस्टने सीएसकेच्या गोटात खळबळ उडाली आहे. आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये नवीन भूमिकेत दिसू शकतो, असे स्पष्ट संकेत महेंद्रसिंग धोनीने त्याच्या फेसबूक पोस्टमधून दिले आहेत.
Ms Dhoni
Ms Dhonisaam tv
Published On

MahendraSingh Dhoni Facebook Post:

आयपीएल 2024चा थरार अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 22 मार्चपासून आयपीएलला सुरू होणार आहे. चेपॉकमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात पहिला सामना खेळला जाईल. मात्र एकीकडे चाहत्यांना आयपीएलची उत्सुकता असतानाच महेंद्रसिंग धोनीच्या एका पोस्टने सीएसकेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

काय आहे धोनीची पोस्ट?

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांची धडधड वाढवली आहे. आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL, 2024) मध्ये नवीन भूमिकेत दिसू शकतो, असे स्पष्ट संकेत महेंद्रसिंग धोनीने त्याच्या फेसबूक पोस्टमधून दिले आहेत. त्याच्या या पोस्टमुळे चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.

धोनीने (MS Dhoni) फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, 'नव्या सीझन आणि नवीन 'भूमिका'ची वाट पाहू शकत नाही. संपर्कात राहा!' या पोस्टमध्ये माहीने त्याची नवीन भूमिका कोणती असेल याचा खुलासा केलेला नाही. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसह क्रिकेटप्रेमीही बुचकळ्यात पडले आहेत. महेंद्रसिंग धोनी नेमकी कोणती नवी भूमिका घेणार आहे? याबाबत आता क्रिडाविश्वात चर्चा रंगू लागल्या आहेत.

Ms Dhoni
Ranji Trophy: मुंबईच्या संघाने ४१ वेळा मिळवलं फायनलचं तिकीट; असा राहिलाय मुंबईचा इतिहास

दरम्यान, 42 वर्षीय धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र तो आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने (CSK) 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने 2023 च्या शेवटच्या हंगामातही विजेतेपद पटकावले होते. (Latest Marathi News)

Ms Dhoni
Rohit Sharma Record: धरमशालेत मोठा रेकॉर्ड हिटमॅनच्या रडारवर! या बाबतीत विवियन रिचर्ड्सला मागे सोडण्याची संधी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com