Rameshwaram Cafe Bomb Blast: बसमधून उतरला, कॅफेत शिरला, अन् ९ मिनिटात फरार.. बंगळुरु बॉम्बस्फोट प्रकरणातील धक्कादायक CCTV Footage

Rameshwaram Cafe Bomb Blast CCTV Footage: सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयिताने बसस्थानकात वेळ घालवल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्टँडमध्येच बॉम्बचा टायमर लावला होता का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
Rameshwaram Cafe Bomb Blast CCTV Footage
Rameshwaram Cafe Bomb Blast CCTV FootageSaamtv

Rameshwaram Cafe Bomb Blast:

बंगळुरुच्या प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेत (Rameshwar Cafe) बॉम्बस्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. या स्फोटात 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. या बॉम्बस्फोट प्रकरणात रोज नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. अशातच आता या घटनेतील एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

बेंगळोर (Banglore) येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाच्या तपासात काही खुलासे समोर आले आहेत. तपास पथकाला संशयिताचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, त्यात तो पांढरी टोपी आणि राखाडी रंगाचा शर्ट घातलेला दिसत आहे. त्याच्या पाठीवर एक बॅग आहे, ज्यामध्ये संशयिताने बॉम्ब नेला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे..

आरोपी व्यक्ती बसने आली, स्टँडमध्ये काही वेळ घालवला आणि नंतर कॅफेमध्ये बॉम्ब ठेवून पळून गेल्याचे सीसीटीव्हीत उघड झाले आहे. या व्हिडिओनंतर तपास पथक प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयिताने बसस्थानकात वेळ घालवल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्टँडमध्येच बॉम्बचा टायमर लावला होता का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Rameshwaram Cafe Bomb Blast CCTV Footage
Uddhav Thackeray: ‘मी पुन्हा येईन’ असा आत्मविश्वास आहे, तर पक्ष फोडाफोडी कशाला करता? ठाकरेंचा भाजपला खोचक सवाल

सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक संशयित बसमधून उतरतो, स्टँडमध्ये काही वेळ घालवतो, त्यानंतर तिथे ठेवलेल्या खुर्चीवर त्याची बॅग ठेवतो आणि त्याची चेन उघडताना दिसतो. नेमक्या याच क्षणी संशयिताने तिथे बॉम्बचा टायमर लावला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.सीसीटीव्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर बसस्थानकावर टायमर लावल्यानंतर व्यक्ती कॅफेमध्ये घुसली का?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Latest Marathi News)

Rameshwaram Cafe Bomb Blast CCTV Footage
Wai : धोम बलकवडीच्या पाण्यासाठी 30 गावातील शेतकरी एकवटले, वाईमध्ये उपाेषणास प्रारंभ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com