सिद्धेश म्हात्रे, प्रतिनिधी|ता. ४ मार्च २०२४
आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेना ठाकरे गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज उद्धव ठाकरे हे मावळ लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पनवेल, खोपोली, उरण,या ठिकाणी जाहीर सभा झाल्या. या सभेतून ठाकरेंनी आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याचे आव्हान करत जोरदार पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
"आता फक्त कार्यालयाचे उदघाटन आहे तरी अशी गर्दी. विजयाच्या मिरवणूकीला किती गर्दी असेल. छत्रपतीच्या जिल्ह्यात पवित्र भगवा फडकणार नाहीतर कोणाचा फडकणार? पुन्हा भाजप आल्यास ही शेवटची निवडणूक ठरेल. आज दिल्लीतले सांगतात पुन्हा येईल. एवढा आत्मविश्वास आहे मग पक्ष का फोडता? संकटात ज्यांनी साथ दिली त्यांना तुम्ही संपवायला निघालात. शिवसेनेने तुम्हाला खांद्यावर बसवून महाराष्ट्र फिरवला नाहीतर खांदा द्यायला चार लोकं नसती," अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
तरचं अच्छे दिन येतील..
"सगळ्या पक्षाच्या खात्यात किती पैसे आहेत ते काढा. 10 वर्षात 6 हजार कोटी भाजपच्या खात्यात आहेत. काँग्रेसने नाही तुम्ही देशाला लुटलं. पीएम केअरमध्ये किती कोटी रुपये जमा झाले कोणाला कळूच देत नाहीत. हा खाजगी फंड मग पीएम केअर फंड आमचा पंतप्रधान झाल्यास त्याच्या नावे होईल का? याच उत्तर द्यावं. भाजप ही वृत्ती देशातून संपवावी लागेल. तरच सगळ्यांचे अच्छे दिन येतील," असे आवाहनही ठाकरेंनी यावेळी केले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ही लढाई हुकूमशाही विरुद्ध लोकशाही
"संजोगच्या रूपाने चांगला मर्द दिलाय. हे निष्ठावान घराणं. संजोग सत्ता आणायची म्हणून आलेत. मी जिथे जिथे जातोय तिथे मोठी गर्दी होतेय. शिवसेनेचे हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व यात बराच फरक आहे. आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व. ही लढाई हुकूमशाही विरुद्ध लोकशाही. परत देश यांच्या हातात गेला तर लाचारीच जीवन जगावं लागेल. महाराष्ट्र देशाला दिशा दाखविण्यासाठी सज्ज आहे," असा विश्वासही ठाकरेंनी व्यक्त केला. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.