Buldhana News: अवकाळीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर, शेतपिकांचं अतोनात नुकसान; शेतकरी हवालदिल

Unseasonal Rain In Jamod and Sangrampur: बुलढाणा जिल्हातील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपलं आहे. नागरिकांच्या घरांची पडझड झालीय. शेतपिकांचंही अतोनात नुकसान झालं आहे.
Jalgaon News
Jalgaon NewsSaam Tv
Published On

संजय जाधव

Unseasonal Rain Updates

बुलढाणा जिल्ह्यात (Jalgaon News) दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसानं थैमान मांडलं होतं. या अवकाळी पावसामुळं शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांच्या अगदी तोंडचा घास पळाला आहे. या अवकाळी पावसामुळे नागरिकांच्या घरांचीही पडझड (House Collapse) झाली आहे. त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. (latest marathi news)

दोन दिवस अगोदर अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यानं जळगाव, जामोद व संग्रामपूर तालुक्याला अक्षरश: झोडपून काढलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव, जामोद तालुक्यातील सुनगाव, जामोद, (Unseasonal Rain In Jamod and Sangrampur) उसरा या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अवकाळी पावसामुळं बळीराजा हवालदिल

अनेक नागरिकांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. वादळी वारा आणि गारपीटीने या दोन्ही तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालं (Unseasonal Rain In Jalgaon) आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास मातीत मिसळल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

त्याचप्रमाणे संग्रामपूर तालुक्यातील वानखेड, वरवट बकाल, एकलारा, सोनाळा टूनकी या भागातील नागरिकांचं अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान (Rain Updates) झालं आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे. रब्बी पिकांचे नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात आहे. 

Jalgaon News
Unseasonal Rain In Mumbai : ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी; चाकरमान्यांची उडाली धांदळ

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे

दरम्यान काँग्रेसच्या पक्षनेत्या डॉ. स्वातीताई वाकेकर यांनी जामोद परीसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर भेट ( Unseasonal Rain Latest Update) दिली. त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. जळगाव जामोदच्या तहसीलदार शितल सोलाट व महसुलच्या कर्मचाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे ( Crop Loss) करावे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ मदत करण्याची मागणी केली आहे. अवकाळी पावसामुळं (Unseasonal Rain News) बळीराजा हवालदिल झाला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे.

Jalgaon News
Rain Alert: मुंबई-पुण्यासह 'या' भागांना आज मुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान? वाचा...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com