Unseasonal Rain In Mumbai : ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी; चाकरमान्यांची उडाली धांदळ

Unseasonal Rain : उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासूनच शहरांत ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सध्या रिमझिम पावसाने शहरांमध्ये शिडकाव केलाय.
Unseasonal Rain In Mumbai
Unseasonal Rain In MumbaiSaam TV
Published On

Mumbai :

राज्यात अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसानं हजेरी लावाली आहे. अशात मुंबईमध्ये देखील आज सकाळी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) दाखल झाला. मुंबईच्या काही उपनगरांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूरमध्ये पाऊस आल्याने सकाळी कामासाठी घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांची चांगलीच धांदळ उडाली.

Unseasonal Rain In Mumbai
Best Bus Mumbai: मुंबईकरांचा 'बेस्ट' प्रवास महागला; आता पाससाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये

अचानक आलेल्या पावसामुळे काही वेळ मध्य रेल्वे उशिराने धावत होत्या. डोंबिवली ते ठाणे दरम्यान सकाळच्या सुमारास ट्रेन उशिराने सोडल्या गेल्या. उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासूनच शहरांत ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सध्या रिमझिम पावसाने शहरांमध्ये शिडकाव केलाय.

मुंबईसह पुणे शहरात देखील आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. पहाटेच्या सुमारास काही शहरात हालक्या पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रातील वाढत्या तापमानामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल,तर काही भागात गारपीट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

मुंबई तसेच पुण्यामध्ये ढगाळ वातावरण आणि पावसामुळे वाढलेला उन्हाचा चटका काही प्रमाणात कमी झालाय. दुपारनंतर आणखी हलका पाऊस, तर काही भागांत गारपीट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

बंगालच्या उपसागरावरून येणारऱ्या आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे पुढील तीन ते चार दिवसांत कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भाग आणि मराठवाडा, विदर्भातील काही भागांत विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस, तर काही ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे.

Unseasonal Rain In Mumbai
Rain Alert: मुंबई-पुण्यासह 'या' भागांना आज मुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान? वाचा...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com