Best Bus Mumbai: मुंबईकरांचा 'बेस्ट' प्रवास महागला; आता पाससाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये

Best Bus Pass Price: मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. आजपासून बेस्ट बसचा प्रवास महागला आहे.
Best Bus Pass Monthly Price
Best Bus Pass Monthly Price Saam TV
Published On

Best Bus Pass Monthly Price

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. आजपासून बेस्ट बसचा प्रवास महागला आहे. बेस्टच्या दैनंदिन पासच्या दरात १० रुपयांनी, तर मासिक पासच्या दरात तब्बल १५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आजपासून म्हणजेच १ मार्चपासून ही दरवाढ लागू होणार आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Best Bus Pass Monthly Price
kalyan News: ठेकेदाराचा हलगर्जीपणा नडला; महामार्गासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून बेस्ट बसची (Mumbai Best Bus) ओळख आहे. दररोज लाखो मुंबईकर बेस्ट बसने प्रवास करतात. प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टने मासिक पाससोबत दैनंदिन पास सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. त्याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्राप्त माहितीनुसार, बेस्टच्या दैनंदिन आणि मासिक पासधारकांची संध्या १ लाख ४० हजार ९६५ इतकी आहे. याशिवाय तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. दरम्यान, उत्पन्न वाढावे यासाठी बेस्ट उपक्रमाने दैनंदिन आणि मासिक पासच्या दरपत्रकात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

सुधारित योजनेनुसार, याआधी बेस्टच्या दैनंदिन बसप्रवासाठी पासची किंमत ५० रुपये इतकी होती. आता त्यात १० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच बेस्टची दैनंदिन अमर्याद पास ६० रुपये इतकी झाली आहे. याशिवाय मासिक पासमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे.

यापूर्वी बेस्टची मासिक पास ७५० रुपये इतकी होती. आता त्यात १५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना मासिक पास काढण्यासाठी आता ९०० रुपये मोजावे लागणार आहे. दरम्यान, सुधारित बसपास वातानुकूलित तसेच विना-वातानुकूलित बससेवांवर लागू आहेत. सर्वसाधारण तिकीट दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

Best Bus Pass Monthly Price
Daily Horoscope: आजचे राशिभविष्य १ मार्च २०२४ मेष ते मीन राशींसाठी मार्चचा पहिला दिवस काय घेऊन आलाय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com