Wai : धोम बलकवडीच्या पाण्यासाठी 30 गावातील शेतकरी एकवटले, वाईमध्ये उपाेषणास प्रारंभ

आभेपुरी ते शिरगाव डोंगाराकडील सर्व गावांना कॅनलने पाणी मिळावे या प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदार कार्यालयास देण्यात आले.
30 villages from wai demands dhom balkawadi water
30 villages from wai demands dhom balkawadi watersaam tv
Published On

Satara :

धोम बलकवडी धरणातील (dhom balkawadi dam) वाई तालुक्यातील पूर्व भागातील 30 गावांना पाण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप करत आज (साेमवार) वाई (wai) येथे शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलन (andolan) केले. तहसील कार्यालयासमोर आंदाेलकांनी साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुमारे 12 हजार आठशे हेक्टर शेतीला 4 टीएमसी पाणी ग्रॅव्हिटीने मिळावे, यासाठी आजपासून हे आंदाेलन करण्यात आले. यामध्ये वाई तालुक्यातील पूर्व भागातील 30 गावचे शेतकरी महिला, भगिनी उपस्थित होत्या. (Maharashtra News)

30 villages from wai demands dhom balkawadi water
Dombivli News : डोंबिवली मानपाडा पोलिसांची माेठी कामगिरी, रिक्षा चोरट्यांसह सात अटकेत

यावेळी आंदाेलकांनी कर्जमाफी व्हावी, शेतकऱ्यांना वीजबिल माफी द्यावी, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणात फी माफी द्यावी या प्रमुख मागणीसह धोम बलकवडे धरणातून 12000 हेक्टर क्षेत्राला 4 टीएमसी ग्रॅव्हिटीने पाणी मिळावे अशा घाेषणा केल्या. तसेच आभेपुरी ते शिरगाव डोंगाराकडील सर्व गावांना कॅनलने पाणी मिळावे या प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदार कार्यालयास देण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

30 villages from wai demands dhom balkawadi water
Nitesh Rane On Manoj Jarange Patil : मनाेज जरांगे पाटील यांना आता मराठा समाज गांभीर्याने घेत नाही : नितेश राणे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com