Nitesh Rane On Manoj Jarange Patil : मनाेज जरांगे पाटील यांना आता मराठा समाज गांभीर्याने घेत नाही : नितेश राणे

Nitesh Rane Latest Marathi News : देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला मान सन्मान दिला शरद पवार यांनी नाही असे आमदार निलेश राणे यांनी नमूद केले.
maratha samaj neglects manoj jarange patil says nitesh rane
maratha samaj neglects manoj jarange patil says nitesh rane Saamtv

- विनायक वंजारे

Sindhudurg :

मराठा आंदाेलक मनाेज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांना मराठा समाज आता गांभीर्याने घेत नाही. मनाेज जरांगे यांना मराठा समाजात फार माेठा विराेध हाेऊ लागला आहे. ते समाजाबद्धल कमी आणि राजकारण जास्त करत आहेत. त्यामुळेच त्यांच्या बोलण्याकडे आम्ही देखील जास्त लक्ष देत नाही असे आमदार नितेश राणे (mla nitesh rane) यांनी नमूद केले. ते सिंधुदूर्ग येथे माध्यमांशी बाेलत हाेते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मी नेत्याला, पक्षाला बाेललाे तर सर्व मराठा नेते तुटून पडले आहेत. तुम्हांला मराठ्यांना निवडून आणले आहे असे मनाेज जरांगे पाटील यांनी म्हटलं हाेते. त्यावर आमदार नितेश राणे म्हणाले आता मनाेज जरांगे पाटील हे राजकारण जास्त करु लागल्याने मराठा समाज आता गांभीर्याने घेत नाही. मराठा समाजाला सर्व लक्षात आलं आहे. (Maharashtra News)

maratha samaj neglects manoj jarange patil says nitesh rane
Lok Sabha Election 2024 : भावनिक होऊन निवडणुका जिंकता येत नाहीत; प्रविण दरेकर यांचा उद्धव ठाकरेंना टाेला (पाहा व्हिडिओ)

मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी न्याय मिळवून दिला. फडणवीस यांनी मराठा समाजाला मान सन्मान दिला शरद पवार (sharad pawar) यांनी नाही असेही राणेंनी म्हटले. त्यामुळे मनाेज जरांगे पाटील हे फडणवीस यांच्यावर टीका करत असतील तर ते चुकीचे आहे. चांगल्या चांगले म्हणावे त्याला माणुसकीचा धर्म म्हणतात असेही राणेंनी म्हटलं.

विनाक राऊत यांचा पराभव अटळ

दरम्यान आगामी लाेकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार विनायक राऊत (mp vinayak raut) यांचा पराभव अटळ असल्याचे आज पुन्हा एकदा आमदार नितेश राणेंनी नमूद केले. ते म्हणाले त्यांना निवडणुक पडण्याची एवढी घाई झाली असेल तर त्यांनी बॅग भरून ठेवावी.

Edited By : Siddharth Latkar

maratha samaj neglects manoj jarange patil says nitesh rane
Saam Impact : शाळेच्या व्हरांड्यात बसून धडे गिरवणा-या विद्यार्थ्याला शिक्षणाची कवाडे खूली, 'साम टीव्ही' मुळेच झाले शक्य आरे ग्रामस्थांची भावना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com