Raigad Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वेळ साधली; रायगड दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

Shivsena Latest News: उद्धव ठाकरे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते मावळ, पनवेल आणि उरणमध्ये जंगी सभा घेणार आहेत. मात्र, त्यांच्या दौऱ्यापूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
Uddhav Thackeray Eknath Shinde
Uddhav Thackeray Eknath ShindeSaam TV
Published On

Uddhav Thackeray vs Eknath Shinde

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये ठाकरे गटाच्या वादळी सभा होत आहेत. आज उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते मावळ, पनवेल आणि उरणमध्ये जंगी सभा घेणार आहेत. मात्र, त्यांच्या दौऱ्यापूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Uddhav Thackeray Eknath Shinde
Manoj Jarange News: माझं पाकीट मारलं तर चोरालाही टेन्शन येईल; SIT चौकशीवर मनोज जरांगेंचा टोला

ठाकरे गटाच्या उरण तालुक्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी रविवारी (३ मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात नवघर, उरण, उलवे तसेच इतर विभागातील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी ही नक्कीच वाईट बातमी आहे. (Latest Marathi News)

उरण तालुक्यातील ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील शुभदीप या निवासस्थानी भेट घेतली आणि शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे उरणमधील शिंदे गटाची ताकद वाढली असून ठाकरे गटाची (Uddhav Thackeray) ताकद घटली आहे.

शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये नवघर पंचायत समितीचे सदस्य दीपक ठाकूर, उरण पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत पाटील, उलवे नोडचे शहरप्रमुख प्रथम पाटील, शाखाप्रमुख विजय भिसे आणि युवासेनेचे क्षितिज शिंगरे आदींचा समावेश आहे.

यावेळी शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के देखील उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा त्यांनी काही मागण्या केल्या होत्या. त्या मागण्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. वर्षभरात नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील सुरू होईल. त्यामुळे येथे अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. त्याचा फायदा स्थानिकांनी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Uddhav Thackeray Eknath Shinde
Rahul Gandhi: निवडणुकीआधी राहुल गांधींची मोठी घोषणा; INDIA आघाडी सत्तेत आल्यास ९६४००० तरुणांना रोजगार देणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com