Manoj Jarange News: माझं पाकीट मारलं तर चोरालाही टेन्शन येईल; SIT चौकशीवर मनोज जरांगेंचा टोला

Manoj Jarange vs Devendra Fadnavis: सगेसोयऱ्यांचा मुद्दा मिटल्याशिवाय निवडणुका घेतल्या, तर मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
Devendra Fadnavis Vs Manoj Jarange
Devendra Fadnavis Vs Manoj Jarange Saam TV

Manoj Jarange Patil criticizes Devendra Fadnavis

सगेसोयगरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून कायद्यात रुपांतर करा, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. सगेसोयऱ्यांचा मुद्दा मिटल्याशिवाय निवडणुका घेतल्या, तर मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही जरांगे यांनी सरकारला दिला आहे. सध्या जरांगेंनी संवाद दौरा सुरू केला असून आज ते सोलापुरात आहेत.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Devendra Fadnavis Vs Manoj Jarange
Rahul Gandhi: निवडणुकीआधी राहुल गांधींची मोठी घोषणा; INDIA आघाडी सत्तेत आल्यास ९६४००० तरुणांना रोजगार देणार

दरम्यान, बार्शी तालुक्यातील वैराग येथे सोमवारी दुपारी ११ वाजता मनोज जरांगेंचं आगमन झालं. यावेळी मराठा बांधवांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज्य सरकारवर निशाणा साधला.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

यावेळी जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) जोरदार टीका केली. "मी तुम्हाला काहीच बोललो नाही. तरी पण तुम्हाला माझे शब्द लागले असतील, तर ज्यावेळी अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीमारात मराठा बांधव-भगिनींची डोकी फुटली, त्यावेळी तुम्हाला आई-बहीण दिसली नाही का?", असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला. (Latest Marathi News)

"तुम्हाला मी एक शब्द बोललो, तर इतका लागला. पण माझ्या आई-बहिणींना तुम्ही केलेल्या लाठीमारामुळे आजही शेतात जाता येत नाही. त्यांचे पाय मोडले आहेत. त्यावेळेस तुम्हाला थोडी कशी लाज वाटली नाही", अशी घणाघाती टीका देखील जरांगे यांनी फडणवीसांवर केली.

"माझं पाकीट मारलं तर चोरालाही टेन्शन येईल"

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, "मी जेव्हा संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होतो, तेव्हा सरकारने माझ्यावर एसआयटी नेमली. मी एसआयटी चौकशीला अजिबात घाबरत नाही. कारण मी कुणाचाही एक रुपया खाल्लेला नाही. माझं पाकिट चोरलं, तर उलट चोरालाही टेन्शन येईल", असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला.

तुम्ही माझ्यावर एसआयटी चौकशी लावली, यावरून काय साध्य होणार? जे राज्यातील भ्रष्टाचारी नेते आहेत, त्यांची तुम्ही चौकशी करा. तुमच्याभोवती सुगंधी अगरबत्तीप्रमाणे भ्रष्टाचारी नेते फिरताहेत आणि तुम्ही माझी एसआयटी चौकशी करतात, अशी टीकाही जरांगे पाटील यांनी सरकारवर केली.

Devendra Fadnavis Vs Manoj Jarange
Farmers Protest: शेतकऱ्यांनी आखली नवी रणनिती, येत्या ६ मार्चला रेल्वे मार्ग रोखणार; केंद्र सरकारचं टेन्शन वाढणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com