GT VS DC KL Rahul X
Sports

KL Rahul : विराट, रोहित आणि धोनीला जमलं नाही, ते केएल राहुलने करुन दाखवलं; गुजरात विरुद्धच्या सामन्यात रचला मोठा इतिहास

GT VS DC KL Rahul : नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना सुरु आहे. या सामन्यात फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फलंदाज केएल राहुलने नवा विक्रम रचला आहे.

Yash Shirke

GT VS DC Match : गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. शनिवारच्या डबर हेडरमधील पहिल्या सामन्यात गुजरातचा कर्णधार शुबमन गिलने टॉस जिंकला आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिल्लीचा संघ मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी उतरणार आहे.

जॅक फ्रेझर-मॅकगर्कला दिल्लीच्या प्लेईंग ११ मधून वगळण्यात आले आहे. त्यामुळे अभिषेक पोरेल आणि करुण नायर हे दोघे मैदानात उतरले. १८ धावा करुन अभिषेक पोरेल माघारी परतला. प्रसिद्ध कृष्णाने केएल राहुलला एलबीडब्लूने आउट केले. पावर प्लेमध्ये दिल्लीच्या दोन विकेट्स पडल्या, त्यावेळेस दिल्लीची धावसंख्या ७३ इतकी होती. केएल राहुल बाद झाल्याने कर्णधार अक्षर पटेल फलंदाजीसाठी आला.

लोकेश राहुलने गुजरातच्या विरुद्ध खेळताना १४ बॉल्सवर २८ धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट २०० इतका होता. या खेळीदरम्यान राहुलने १ षटकार आणि ४ चौकार मारले. त्याने सामन्यात दमदार षटकार मारत नवा विक्रम रचला. केएल राहुलने षटकारांचे दुहेरी शतक म्हणजेच २०० षटकार मारण्याचा इतिहास रचला आहे. आयपीएलमध्ये २०० षटकार मारणारा राहुल आठवा भारतीय आणि ओव्हरऑल पाहता अकरावा खेळाडू आहे. आयपीएलमध्ये सर्वात जलदगतीने २०० षटकार ठोकण्याच्या विक्रमाची नोंद राहुलच्या नावावल झाली आहे.

गुजरात टायटन्सची प्लेईंग ११ -

साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अरशद खान, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग ११ -

अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नवरात्र उत्सवाला एकनाथ शिंदे भेट देणार

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

SCROLL FOR NEXT