Trimbakeshwar Temple: त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना कपडे फाटेपर्यंत मारहाण, सुरक्षारक्षकाने आधी लाथा मारल्या नंतर...; VIDEO व्हायरल
Trimbakeshwar TempleSaam Tv

Trimbakeshwar Temple: त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना कपडे फाटेपर्यंत मारहाण, सुरक्षारक्षकाने आधी लाथा मारल्या नंतर...; VIDEO व्हायरल

Security Guard Thrashes Devotees: त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. कपडे फाटेपर्यंत भाविकांना मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Published on

Summary -

  • त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण

  • दर्शन रांगेत वादातून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप

  • दोन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

  • भाविकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे

नाशिकच्या प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सुरक्षारक्षकाने भाविकांना मारहाण केल्याची घटना घडली. सलग सुट्टी आल्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. मंदिरात दर्शनासाठी मोठी रांग लागली. यावेळी सुरक्षकाने भाविकांना मारहाण केल्या दोन घटना घडल्या. लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या घटनेचे व्हिडीओ समोर आले असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना सुरक्षा रक्षकांकडून मारहाण करण्यात आली. सुरक्षारक्षकाने भाविकांना मारहाण केल्याच्या सकाळपासून दोन घटना घडल्या. दर्शन रांगेत उभ्या राहिलेल्या भाविकांसोबत हा प्रकार घडला. मंदिरामध्येच कुस्तीचा आखाडा रंगला. सुरक्षारक्षकाने मंदिरामध्येच कपडे फाटेपर्यंत भाविकाला मारहाण केली. या मारहाणीचे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर भाविकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहे.

Trimbakeshwar Temple: त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना कपडे फाटेपर्यंत मारहाण, सुरक्षारक्षकाने आधी लाथा मारल्या नंतर...; VIDEO व्हायरल
Nashik Crime : पोलिसाच्या घरात रक्तरंजित थरार, छोट्या मुलानं मोठ्याचा घेतला जीव; चाकूने सपासप वार केले नंतर...

सलग सुट्ट्या आल्यानं त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. यापूर्वीही भाविकांना सुरक्षा रक्षकांकडून मारहाणीचे प्रकार समोर आले आहेत. भाविकांना देवाच्या दर्शनाची प्रतीक्षा असताना लाथाबुक्क्यांचा प्रसाद मिळत असल्याची आता चर्चा होऊ लागली आहे. भाविक भर रांगेत ठिय्या मांडून बसल्याने त्यांना सुरक्षारक्षकाने मारहाण केल्याचा प्रकार घडल्याचे त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त कैलास घुले यांनी दावा केला.

Trimbakeshwar Temple: त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना कपडे फाटेपर्यंत मारहाण, सुरक्षारक्षकाने आधी लाथा मारल्या नंतर...; VIDEO व्हायरल
Nashik : नाशिकमध्ये नेमकं काय चाललंय? १९ वर्षाच्या तरूणीची २ लाखांत विक्री, जबरदस्तीने लग्न लावले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com