IPL 2025 : केएल राहुलकडून दिल्लीच्या कोचचा अपमान? सगळ्यांसमोर नको ते बोलला अन् व्हिडिओच व्हायरल झाला

Viral Video : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यादरम्यान दिल्लीचे प्रशिक्षक केविन पीटरसन आणि केएल राहुल यांच्या एका व्हायरल व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे.
Delhi Capitals Viral Video
Delhi Capitals Viral VideoX
Published On

IPL 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्स सुरुवातीपासूनच शानदार फॉर्ममध्ये आहे. दिल्लीने ६ पैकी ५ सामने जिंकले आहे. दिल्लीचा संघ सध्या पॉईंट्स टेबलवर टॉपवर आहे. आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना आहे. या सामन्यादरम्यान सोशल मीडियावर केएल राहुल आणि दिल्लीचे कोच केविन पीटरसनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

दिल्ली कॅपिटल्सच्या सोशल मीडिया अकांउटवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये केएल राहुल, केविन पीटरसन आणि शुबमन गिल यांची मजामस्ती पाहायला मिळत आहे. गुजरातचा कर्णधार शुबमन गिल दिल्ली कॅपिटल्सच्या सरावसत्रात येतो आणि केविन पीटरसन यांनी मिठी मारतो. केविन यांनी गिल विचारतो, 'नीट सुरु आहे ना सगळं?'

Delhi Capitals Viral Video
Anaya Bangar: ते न्यूड फोटो मला पाठवायचे, संबंध ठेवायला सांगायचे, भारतीय क्रिकेटपटूंवर अनाया बांगरचे धक्कादायक आरोप

शुबमन गिलच्या प्रश्नाचे उत्तर देताना केविन पीटरसन गमतीने म्हणतात, 'मेंटॉर म्हणजे काय? इथे कुणाला माहीत आहे का मेंटॉर म्हणजे नक्की काय? तुम्ही मला सांगू शकता का मेंटॉर कोण आहे? त्यानंतर केएल राहुल लगेच 'मेंटॉर अशी व्यक्ती जी आयपीएल सीझन सुरु असताना मध्येच दोन आठवड्यांसाठी मालदीवला फिरायला जाते' असे म्हणतो. केल राहुलच्या बोलण्यावर सगळे हसू लागतात.

Delhi Capitals Viral Video
IPL 2025 सुरु असताना BCCI ॲक्शन मोडवर, मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे फ्रँचायझी मालकावर घातली बंदी

केविन पीटरसन हे दिल्ली कॅपिटल्स संघाचे मेंटॉर आहेत. काही दिवसांपूर्वी ते सुट्ट्यांसाठी मालदीवला गेले होते. १० एप्रिल रोजी दिल्ली विरुद्ध बंगळुरू सामन्याच्या वेळेस पीटरसन दिल्लीच्या संघासोबत नव्हते. पण केविन पीटरसन यांच्या मार्गदर्शनामध्ये दिल्ली कॅपिटल्सने दमदार खेळी केली आहे. दिल्लीचा संघ सध्या टेबल टॉपर आहे. असाच फॉर्म टिकून राहिला तर दिल्लीचा संघ सर्वप्रथम प्लेऑफमध्ये प्रवेश करेल असे म्हटले जात आहे.

Delhi Capitals Viral Video
IPL 2025 : संजू सॅमसन आणि राहुल द्रविड यांच्यात वाद? व्हायरल व्हिडीओचं सत्य अखेर समोर...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com