KKR vs SRH Chennai Weather Chidambaram Stadium Pitch Report 
Sports

KKR vs SRH Weather Forecast : अंतिम सामन्यात वरुणराजा बॅटिंग करणार? कसं राहील चेन्नईमधील हवामान, जाणून घ्या

KKR vs SRH Chennai Weather Chidambaram Stadium Pitch Report: यंदाच्या आयपीएल हंगामात एकूण तीन सामन्यावर पावसाने पाणी फेरलं होतं. तर एका सामन्यात पावसामुळे षटके कमी करण्यात आली. मुंबई इंडियन्स आणि केकेआर यांच्यातील सामना पावसामुळे १६- १६ षटकांचा करण्यात आला होता.

Bharat Jadhav

आयपीएल २०२४ चा अंतिम सामना आज रविवारी होणार आहे. अंतिम सामन्यात दोन वेळ चॅम्पियन ठरलेला कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आलेत. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. अंतिम सामन्यापूर्वी याच स्टेडियमवर क्वालिफायर-२च्या सामन्यात सनरायझर्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी झाला होता.

या सामन्यात राजस्थानचा पराभव करत हैदराबादच्या संघाने अंतिम सामन्यात रॉयल एन्ट्री घेतली. आता सर्वांच्या त्याच स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्याकडे लागल्यात. परंतु या सामन्यावर पावसाचं सावट आहे. यामुळे अंतिम सामन्यात वरुण राजा बॅटिंग करणार की काय अशी भीती वर्तवली जात आहे.

दोनदा आलेत आमनेसामने

हैदराबाद आणि कोलकाता संघ या मोसमात दोनदा आमनेसामने आलेत. यात कोलकाताच्या संघाने क्वालिफायर-१ मध्ये हैदराबादचा पराभव केला होता. त्यानंतर अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आता परत एकदा श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाशी दोन हात करणार आहे.

तर क्वालिफायर-१ मध्ये केकेआरकडून पराभव मिळाल्यानंतर पुनरागमन करत हैदराबादने राजस्थानला पराभूत करत फायनलमध्ये एन्ट्री केली. क्वालिफायर-2 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्या सामना झाला होता. यात सामन्यात हैदराबादच्या फिरकी गोलंदाजांनी राजस्थानच्या फलंदाजी नाकामी करत त्यांना हरवलं.

हैदराबादचा संघ यापूर्वी २०१८च्या हंगामातील विजेतेपदाच्या सामन्यात पोहोचला होता. त्यात चेन्नई सुपर किंग्ज कडून त्यांचा पराभव झाला होता. हैदराबादचा संघ २०१८ नंतर कधीही विजेतेपदाच्या सामन्यात हैदराबाद पोहोचला नव्हता. आता सहा वर्षानंतर हैदराबादचा संघ अंतिम लढतीसाठी मैदानात उतरत आहे.

सामन्यादरम्यान पाऊस होणार?

हैदराबाद आणि कोलकाता यांच्यातील सामन्याच्या दिवशी चेन्नईमध्ये उष्ण आणि स्वच्छ हवामान असेल. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार या काळात पावसाची शक्यता तीन टक्के आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता नाही. हवामानाच्या अंदाजानुसार चाहत्यांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय सामन्याचा आनंद घेता येणार आहे. मात्र सामन्यादरम्यान संध्याकाळी ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान चालू हंगामात एकूण ३ सामन्यांवर पावसाचं पाणी पेरलं होतं. तर एका सामन्यात पावसामुळे षटके कमी करण्यात आली होती. मुंबई इंडियन्स आणि केकेआर यांच्यातील सामना पावसामुळे १६-१६ षटकांचा करण्यात आला होता, तर १३ मे रोजी कोलकाता आणि गुजरात यांच्यातील सामना रद्द करण्यात आला होता. हैदराबाद आणि गुजरात यांच्यातील सामनाही पावसामुळे रद्द झाला होता. साखळी फेरीतील शेवटचा सामना केकेआर आणि राजस्थान यांच्यात गुवाहाटीमध्ये खेळण्यात येणार होता परंतु तो पावसामुळे होऊ शकला नव्हता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

Maharashtra Live News Update: मुंबई विमानतळ सीमाशुल्क मोठी कारवाई

निवडणुकीत पैसे वाटण्यासाठी रवींद्र चव्हाणांच्या मार्फत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाख रुपये, आमदार राणेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

Hong Kong Fire: हाँगकाँगमध्ये २००० फ्लॅट असलेल्या सोसायटीला भीषण आग! घटनास्थळी ७०० अग्निशमन दल दाखल, १३ जणांचा मृत्यू

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

SCROLL FOR NEXT