KKR VS GT IPL 2025 X
Sports

KKR VS GT : गिल-साई-बटलरकडून धुलाई, गुजरातच्या गोलंदाजांनीही गुंडाळलं; घरच्या मैदानात कोलकाताचं पानिपत

KKR VS GT IPL 2025 : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना गुजरातने जिंकला आहे. प्रथम फलंदाजी करताना गुजराते १९८ धावा केल्या. १९९ धावा करण्यात केकेआरचे खेळाडू अयशस्वी ठरले.

Yash Shirke

IPL 2025 मधील ३९ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने ३९ धावांनी कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला आहे. १९९ धावांचे लक्ष गाठताना केकेआरच्या संघाने १५९ धावा केल्या. टेबल टॉपर्स गुजरातच्या गुणांमध्ये आणखी दोन गुणांची भर पडली आहे. हा गुजरातचा सलग दुसरा विजय आहे, तर कोलकाताचा सलग दुसरा पराभव आहे. शुबमन गिलच्या नेतृत्त्वात गुजरात टायटन्स कमाल कामगिरी करत आहे.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीला उतरताना गुजरातने १९८ धावा केल्या. साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांनी चांगली सुरुवात करवून दिली आणि गुजरातने सामन्यावरची पकड घट्ट केली. साई सुदर्शनने ५२ धावा केल्या. शुबमन गिल ९० धावांवर बाद झाला. जोस बटलरने नाबाद ४१ धावा करत मैदानात टिकून राहिला.

१९९ धावांचे लक्ष गाठताना रहमानउल्ला गुरबाज आणि सुनील नारायण मैदानात उतरले. गुरबाज २ धावांवर बाद झाला. १७ धावा करुन सुनील नारायण परतला. कॅप्टन अजिंक्य रहाणेने अर्धशतकीय खेळी केली. व्यंकटेश अय्यरने १४ धावा केल्या. २१ धावा करत आंद्रे रसेल स्टंपआउट झाला. लगेच १ धाव करुन रमणदीप सिंगदेखील माघारी परतला. त्याच ओव्हरमध्ये मोईन अलीची देखील विकेट पडली. रिंकूने १७ धावा केल्या. तर इम्पॅक्ट प्लेयर रघुवंशीने नाबाद २७ धावा केल्या.

गुजरात टायटन्सची प्लेईंग ११ -

साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, शेरफेन रुदरफोर्ड, राहुल तेवतिया, वॉशिंग्टन सुंदर, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज

(इम्पॅक्टचे पर्याय - इशांत शर्मा, महिपाल लोमरोर, अनुज रावत, करीम जनात, अर्शद खान)

कोलकाता नाईट रायडर्सची प्लेईंग ११ -

रहमानउल्ला गुरबाज, सुनील नारायण, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंह, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती

(इम्पॅक्टचे पर्याय - मनीष पांडे, अंगक्रिश रघुवंशी, रोवमन पॉवेल, लुवनीथ सिसोदिया, अनुकुल रॉय)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT