IPL 2025 : धोनीसोबत खेळले, त्याच दोघांनी CSK वर राग काढला; कॉमेंट्री बॉक्समधूनच कान टोचले, VIDEO

Chennai Super Kings : वानखेडे स्टेडियमवर काल मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सचा ९ विकेट्सने पराभव केला. सीएसकेचा आयपीएल २०२५ मधील खराब फॉर्म सुरु आहे. सीएसकेच्या खराब कामगिरीवर दोन दिग्गज खेळाडूंनी भाष्य केले आहे.
Chennai Super Kings
Chennai Super Kings X
Published On

IPL 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत खराब कामगिरी केली आहे. त्यांनी ८ सामन्यांमधील ६ सामने गमावले आहेत. आयपीएलच्या पॉईंट्स टेबलवर चेन्नईचा संघ दहाव्या म्हणजेच शेवटच्या स्थानी आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी चेन्नईच्या संघाला मोठा संघर्ष करावा लागणार आहे. काल मुंबईने चेन्नईला वानखेडेवर पछाडले. तेव्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या हरभजन सिंह आणि सुरेश रैना यांनी सीएसकेच्या खेळावर संताप व्यक्त केला.

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना मुंबईने ९ विकेट्सनी जिंकला. सामन्यादरम्यान हरभजन सिंह आणि सुरेश रैना हे कॉमेंट्री करत होते. सीएसकेची खराब कामगिरी पाहून दोघांनी मनातील राग व्यक्त केला. सुरेश रैना म्हणाला, 'सीएसकेने मेगा ऑक्शनमध्ये चांगली कामगिरी केली नाही. ऑक्शनमध्ये कितीतरी प्रतिभावान, तरुण खेळाडू होते. ते खेळाडू कुठे आहेत?'

Chennai Super Kings
BCCI चा सर्वात मोठा निर्णय, फक्त एका खेळाडूचं प्रमोशन; रोहित-विराटचं काय झालं?

'तुम्ही लिलावासाठी इतके पैसे घेता. तुम्ही रिषभ पंतला वगळले, श्रेयस अय्यरला वगळले, केएल राहुललाल वगळले. मी कधीही चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला अशा प्रकारे संघर्ष करताना पाहिले नाही', असे वक्तव्य सुरेश रैनाने केले. रैनाच्या मताशी सहमती दर्शवत हरभजन सिंहने देखील चेन्नईच्या टॅलेंट स्काउटिंग टीमवर निशाणा साधला.

Chennai Super Kings
Virender Sehwag : खेळण्याची भूक संपलीये, ते आयपीएलमध्ये सुट्टीसाठी येतात, वीरेंद्र सेहवागची परदेशी खेळाडूंवर जहरी टीका

'सीएसके मोठा संघ आहे. जेव्हा ते ऑक्शनमध्ये गेले, तेव्हा त्यांच्याकडे संधी होती. प्रतिभावान खेळाडूंना ते निवडू शकत होते. सीएसकेमधील असा एकही तरुण खेळाडू नाहीये, ज्याच्यात सामना फिरवून टाकण्याची क्षमता आहे. अशा खेळाडूंना तुम्ही का निवडले असे टॅलेंट स्काउटिंग टीममधल्या लोकांना विचारले पाहिजे, असे वक्तव्य हरभजन सिंहने केले.

सुरेश रैनाची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात रैना हरभजन सिंहशी बोलताना चेन्नईच्या खेळाडूंवर टीका केली आहे. 'आयपीएल २०२५ मध्ये जितकी डॉट बॉल्स सीएसकेच्या खेळाडूंनी खेळली आहे ना.. मला तर वाटतं डॉट बॉल्सच्या मदतीने जंगल तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तुम्ही पर्यावरणाची चिंता न करता सामना कसा जिंकता येईल याची चिंता करायला हवी' असे सुरेश रैनाने म्हटले आहे.

Chennai Super Kings
Preity Zinta Virat Kohli : प्रीती झिंटाने कोहलीला मोबाईलवर काय दाखवले? व्हायरल व्हिडिओमधून चर्चांना उधाण, पाहा पोस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com