Preity Zinta Virat Kohli : प्रीती झिंटाने कोहलीला मोबाईलवर काय दाखवले? व्हायरल व्हिडिओमधून चर्चांना उधाण, पाहा पोस्ट

IPL 2025 PBKS VS RCB : पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन संघ कालच्या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात आमनेसामने आले. सामना संपल्यानंतर प्रीती झिंटाने विराट कोहलीची भेट घेतली. या भेटीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Preity Zinta Virat Kohli
Preity Zinta Virat Kohli X
Published On

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ च्या ३७ व्या सामन्यात पंजाब किंग्सचा ७ विकेट्सने पराभव केला. विराट कोहलीने या सामन्यात अर्धशतकीय खेळी केली. त्याने ५४ चेंडूंमध्ये नाबाद ७३ धावा केल्या. यात त्याने सात चौकार आणि एक षटकार मारला. शानदार कामगिरीमुळे विराट प्लेयर ऑफ द मॅच बनला. सामना संपल्यानंतर तो पंजाब किंग्सची मालकीन प्रीती झिंटाला भेटला. तेव्हाचा विराट आणि प्रीतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये विराट कोहली पंजाब किंग्सच्या खेळाडूंशी संवाद साधत असल्याचे दिसते. तेवढ्यात तेथे प्रीती झिंटा येते. कोहली तिला भेटतो, तिच्याशी हस्तांदोलन करतो आणि गप्पा मारु लागतो. त्यानंतर प्रीतीच्या हातातल्या मोबाइलमध्ये ते दोघे काहीतरी पाहतात. प्रीती झिंटा मोबाइलमध्ये पाहून हसते. विराट आणि प्रीतीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रीती-विराट फोनमध्ये काय पाहत होते? याची चर्चा सुरु झाली आहे.

Preity Zinta Virat Kohli
महिलांशी अनैतिक संबंध, हुंड्यासाठी छळ, घरगुती हिंसा... IPL मध्ये १७४ विकेट्स घेतलेल्या खेळाडूवर पत्नीचे गंभीर आरोप

१८ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स हा सामना खेळला गेला. पावसामुळे २० ऐवजी १४ ओव्हर्सचा खेळ रंगला. या सामन्यात पंजाबने बंगळुरूवर मात केली आणि पुन्हा चिन्नास्वामी स्टेडियमवर म्हणजेच घरच्या स्टेडियमवर आरसीबीचा पराभव झाला. या पराभवाचा वचपा कालच्या सामन्यात बंगळुरूच्या संघाने काढला.

Preity Zinta Virat Kohli
BCCI चा सर्वात मोठा निर्णय, फक्त एका खेळाडूचं प्रमोशन; रोहित-विराटचं काय झालं?

पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्यात आरसीबीचा ७ विकेट्सनी विजय झाला. विराट कोहलीने कालच्या सामन्यात सर्वाधिक ७३ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या संघाने १५७ धावा केल्या होत्या. त्यानंतर १८.५ ओव्हर्समध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सामना जिंकला. या विजयामुळे बंगळुरूचा संघ पॉईंट्स टेबलवर तिसऱ्या क्रमावर पोहोचला आहे.

Preity Zinta Virat Kohli
Virat Kohli : तुझ्या कोचला ओळखतो, २० वर्षांपासून...! सामन्यात विराट कोहलीची 'दादागिरी', Video व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com