Shubman Gill KKR VS GT
Shubman Gill KKR VS GTX

शुबमन गिल लवकरच अडकणार विवाहबंधनात? टॉसदरम्यान विचारलेल्या प्रश्नावर गुजरातचा कॅप्टन काय म्हणाला?

Shubman Gill KKR VS GT : ईडन गार्डन स्टेडियमवर आज कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आले आहेत. सामन्याच्या टॉस दरम्यान शुबमन गिलला त्याच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावरुन गिल सध्या चर्चेत आहेत.
Published on

KKR VS GT IPL 2025 : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यात केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साई सुदर्शन आणि शुबमन गिल हे गुजरातचे सलामीवीर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले.

ईडन गार्डन्सवर टॉस जिंकल्यानंतर डॅनी मॉरिसन यांनी केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेशी चर्चा केली. त्यानंतर शुबमन गिलसोबत त्यांनी संवाद साधला. मॉरिसन यांनी शुबमन गिलकडे पाहिले आणि 'छान दिसतोय. लग्न करायचा काही प्लान आहे का? तू लवकरच लग्न करणार आहेस का?' असा सवाल केला. यावर हसत गिलने 'नाही, सध्यातरी काही प्लान नाहीये', असे म्हटले.

Shubman Gill KKR VS GT
IPL 2025 : धोनीसोबत खेळले, त्याच दोघांनी CSK वर राग काढला; कॉमेंट्री बॉक्समधूनच कान टोचले, VIDEO

शुबमन गिलच्या नेतृत्त्वात गुजरात टायटन्सच्या संघाने चांगली कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्सकडे १० गुण आहेत. सध्या आयपीएलच्या पॉईंट्स टेबलवर गुजरातच्या संघ पहिल्या स्थानी आहे. आतापर्यंत गुजरातने आयपीएल २०२५ मध्ये ७ सामने खेळले आहेत. यातील ५ सामन्यात गुजरातचा विजय, तर २ सामन्यात पराजय झाला आहे.

Shubman Gill KKR VS GT
IPL 2025 : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, तगडा खेळाडू संघाबाहेर; प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशांवर पाणी?

गुजरात टायटन्सची प्लेईंग ११ -

साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर, शेरफेन रुदरफोर्ड, राहुल तेवतिया, वॉशिंग्टन सुंदर, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज

(इम्पॅक्टचे पर्याय - इशांत शर्मा, महिपाल लोमरोर, अनुज रावत, करीम जनात, अर्शद खान)

कोलकाता नाईट रायडर्सची प्लेईंग ११ -

रहमानउल्ला गुरबाज, सुनील नारायण, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंह, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती

(इम्पॅक्टचे पर्याय - मनीष पांडे, अंगक्रिश रघुवंशी, रोवमन पॉवेल, लुवनीथ सिसोदिया, अनुकुल रॉय)

Shubman Gill KKR VS GT
टीम इंडियात काहीतरी घडतंय? कोचिंग स्टाफमधून हटवलेल्या अभिषेक नायरला रोहित शर्मा म्हणाला, थँक्स ब्रो!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com