IPL  saam tv
Sports

IPL 2025 : आयपीएल सुरु होण्याआधी केकेआरला मोठा झटका; स्टार गोलंदाज स्पर्धेतून बाहेर

umran malik News : आयपीएल सुरु होण्याआधी केकेआरला मोठा झटका बसला आहे. स्टार गोलंदाज स्पर्धेतून बाहेर गेला आहे. उमरान मलिक स्पर्धेतून बाहेर गेलाय.

Vishal Gangurde

कोलकाता नाइट रायडर्सला आयपीएल सुरु होण्याआधी मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार गोलंदाज उमरान मलिक दुखापतग्रस्त झाल्यामुळे स्पर्धेतून बाहेर गेला आहे. उमरान मलिकला केकेआरने ७५ लाख रुपयांना खरेदी केलं होतं. उमरान याआधी सनरायजर्स हैदराबाद संघाचा भाग होता.

हैदराबादने उमरानला रिटेन केलं नव्हतं. यानंतर मलिक ऑक्शन पूलवर पोहोचला होता. केकेआरने उमरान मलिकच्या जागी दुसरा खेळाडू घेण्याची घोषणा केली. त्यानंतर उमरानच्या जागी चेतन सकारियाला स्थान देण्यात आलं. चेतन सकारिया भारतासाठी दोन टी२० सामने खेळला आहे. या व्यतिरिक्त १९ आयपीएल सामन्यात २० गडी बाद केले आहेत.

उमरान मलिकने केकेआर संघात सामिल होण्याची इच्छा व्यक्त केली होती. उमरान म्हणाला होता की, 'मी केकेआर संघासाठी खेळण्यास उत्सुक आहे. मी केकेआरची जर्सी घालण्यास आतूर आहे. मी आता जास्त वेळ वाट पाहू शकत नाही. केकेआर डिफेडिंग चॅम्पियन्स आहे. या वर्षी चषक जिंकण्याची शक्यता जास्त आहे.

उमरान हैदराबादसाठी खेळताना भरपूर चर्चेत राहिला. उमरान मलिकने सामन्यात १५० किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी केली आहे. यामुळे उमरानला भारतासाठी टी२० मध्ये डेब्यू करण्याची संधी मिळाली होती. उमरानने यंदा केकेआरकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. केकेआरसाठी चांगली कामगिरी करून टीम इंडियात कमबॅक करणार असल्याचा त्याचा प्लान होता.

आयपीएल कधी सुरु होणार?

आयपीएल स्पर्धेत केकेआरचा पहिला सामना २२ मार्च रोजी असणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना केकेआर आणि आरसीबी दरम्यान ईडन गार्डनवर होणार आहे. केकेआरने ड्वेन ब्रावोला मेंटर बनवलं आहे. तर ओटिस गिब्सनला सहाय्यक कोच बनवलं आहे. आयपीएल स्पर्धेचा १८ वा सीझन आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ईडन गार्डनवर खेळण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

SCROLL FOR NEXT