ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
२२ मार्चपासून आयपीएलचा थरार रंगणार आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का, आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारे फलंदाज कोण, जाणून घ्या.
आयपीएलमध्ये सर्वाधिक ३५७ सिक्स मारण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज क्रिस गेलच्या नावावर आहे.
या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये २८० सिक्स मारले आहेत.
आयपीएलमध्ये आतापर्यंत कोहलीने २७२ सिक्स मारले आहे. विराट कोहली या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
या यादीत भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी चौथ्या क्रमांकावर आहे. धोनीने आयपीएलमध्ये २५२ सिक्स मारले आहेत.
Mr. 360 म्हणजेच एबी डिविलियर्स या यादीत पाचव्या क्रमांकावर असून त्याने २५१ सिक्स मारले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेविड वॉर्नरने आयपीएलमध्ये २३६ सिक्स मारले आहे.