reshma rathod saam tv
Sports

Reshma Rathod In Badlapur: जल्लोष तर होणारच! Kho- Kho World Cup विजेत्या रेश्मा राठोडचे बदलापूरात जंगी स्वागत - VIDEO

Reshma Rathod Welcome In Badlapur: भारताला खो- खो वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या रेश्मा राठोडचे बदलापूरात प्रमुख भूमिका बजावली आहे.

Ankush Dhavre

पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या मातीतील खेळ खो-खोचा वर्ल्डकप दिल्लीत रंगला. या स्पर्धेत जगभरातील दिग्गज खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी निवड झालेल्या भारतीय संघात बदलापूरची शान असलेल्या रेश्मा राठोडचा देखील समावेश करण्यात आला होता. भारताने वर्ल्डकप फायनलमध्ये नेपाळचा पराभव करुन पहिल्याच वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली होती.

ही ट्रॉफी जिंकून देण्यात रेश्मा राठोडनेही मोलाची भूमिका बजावली. दरम्यान रेश्मा राठोड बदलापूरमध्ये परतल्यानंतर तिचं जंगी स्वागत करण्यात आलं. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

भारताच्या खो-खो संघांनं यंदा वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं. वर्ल्डकप विजेत्या संघात भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या रेश्मा राठोड जंगी स्वागत बदलापुरात करण्यात आलं. वर्ल्डकप जिंकल्यानंतर पहिल्यांदाच रेश्मा बदलापूर शहरात आली. त्यावेळी ती ज्या शिवभक्त विद्यामंदिर शाळेत शिकली, त्या शाळेने रेश्माची जंगी मिरवणूक काढली.

ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी नाचत रेश्माचं स्वागत केलं .भटक्या विमुक्त समाजातून आलेल्या रेश्माची आई आणि वडील आजही नाका कामगार म्हणून काम करतात. तिच्या आईने पारंपारिक वेशभूषा करत या मिरवणुकीत सहभाग घेतला.आपल्या यशात आपल्या कुटुंबाची आणि शाळेची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं रेश्माने सांगितलं.

तर आम्ही नाका कामगार आहोत.आर्थिक परिस्थिती बेताची आहे तरी देखील मुलीनं आमचं नाव देशात गाजवलं अशी प्रतिक्रिया रेश्माच्या आईने दिली. तर रेश्मा ज्या शाळेत शिकत होती, त्या शिवभक्त विद्यामंदिर चे त्यावेळचे मुख्याध्यापक आणि आताचे कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे देखील तिच्या विजयी मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यांनी रेश्माचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

Milk And Curd: दूध आणि दही एकत्र खाल्ले तर काय होते?

SCROLL FOR NEXT