Kho Kho World Cup 2025 Final: लय भारी! महिलांनंतर पुरुष संघानं जिंकली फायनल, नेपाळला धूळ चारली

Kho Kho World Cup Men Indian Team Won: महिलांच्या संघाने अनोखी कामगिरी केल्यानंतर पुरुषांच्या संघानेही अंतिम सामन्यात विजय मिळवत वर्ल्ड कप जिंकत विश्व विजेता बनलाय.
Kho Kho World Cup
Kho Kho World Cup Men Indian Team Won:
Published On

खो-खोचा पहिला वर्ल्ड कप दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळला गेला. या स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघाने दमदार कामगिरी केली. दोन्ही संघ विश्व विजेते ठरले आहेत. भारतीय महिला संघाने नेपाळला हरवून विजेतेपद पटकावले. त्यानंतर भारतीय पुरुष संघानेही ऐतिहासिक कामगिरी केली. पुरुषांच्या खो-खो विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि नेपाळ यांच्यात खेळला गेला.

भारतीय संघाने या सामन्यात नेपाळला ५४-३६ च्या अंतराने पराभूत केलं. अंतिम सामन्यात नेपाळच्या संघाने नाणेफेक जिंकली परंतु नेपाळच्या संघाने डिफेन्स करण्याचा निर्णय घेतला. परंतु भारतीय संघाने दमदार खेळ केला. टर्न १ मध्ये अटॅक करत भारतीय संघाने २६ पॉईट मिळवले. त्यानंतर टर्न २ मध्ये आक्रमण करत नेपाळच्या संघाने १८ पाईंट घेतले. यामुळे भारतीय संघाकडे ८ पाईंट्सची आघाडी होती. त्यानंतर भारतीय संघाने तिसऱ्या टर्ममध्ये ५४ पाईंट्स घेतले आणि २६ पॉईट्स आघाडी घेतली होती.

Kho Kho World Cup
Kho Kho World Cup 2025 : 'म्हारी छोरियां...! पहिल्या खो-खो वर्ल्डकप स्पर्धेत भारत ठरला विश्वविजेता, बीडच्या प्रियंकाने इतिहास रचला

त्यानंतर भारतीय संघाने तिसऱ्या टर्ममध्ये ५४ पाईंट्स घेतले आणि २६ पॉईट्स आघाडी घेतली होती. नेपाळला शेवटच्या टर्नमध्ये फक्त ८ पाईंट्स मिळवता आली . त्यामुळे भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला. पुरुषांच्या खो-खो वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण २० संघांनी भाग घेतला होता. यादरम्यान भारतीय पुरुष संघ नेपाळ, पेरू, ब्राझील आणि भूतान यांच्यासोबत अ गटात होता. ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाकडून दमदार कामगिरी पाहायला मिळाली. प्रत्येक सामना जिंकण्यात भारताचा संघ यशस्वी ठरला.

Kho Kho World Cup
Sachin Tendulkar : "मी दहा-साडेदहा वर्षांचा.." सचिन तेंडुलकरने मराठीत सांगितला वानखेडेतील पहिला अनुभव

भारतीय संघाने नेपाळचा ४२-३७ असा पराभव करून स्पर्धेची सुरुवात केली. यानंतर ब्राझीलचा ६४- ३४ असा पराभव झाला. त्याचवेळी पेरूविरुद्ध ७०-३८ असा विजय मिळवला. त्यानंतर भूतानचाही ७१-३४ असा पराभव झाला. बाद फेरीतही टीम इंडियाने एकतर्फी विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत श्रीलंकेचा १००-४० अशा फरकाने पराभव केला. यानंतर उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६०-१८ असा विजय मिळवला. या दमदार कामगिरीमुळे भारतीय पुरुष संघाने अंतिम फेरीत धडक मारली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com