Shreyas Iyer, IND vs ENG ODI: 'मला मध्यरात्री फोन आला अन्...', सामन्यापूर्वी नेमकं काय घडलं? अय्यरचा मोठा खुलासा

Shreyas Iyer On IND vs ENG 1st ODI: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडेत श्रेयसने शानदार अर्धशतकी खेळी केली. दरम्यान श्रेयस अय्यरने मोठा खुलासा केला आहे.
'मला मध्यरात्री फोन आला अन्...', सामन्यापूर्वी नेमकं काय घडलं? अय्यरचा मोठा खुलासा
shreyas iyersaam tv
Published On

श्रेयस अय्यरला जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे, तेव्हा तेव्हा त्याने संधीचं सोनं करुन स्वत:ला सिद्ध केलंय. इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात त्याला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात भारतीय संघाला ४ गडी राखून विजय मिळवून देण्यात अय्यरने मोलाची भूमिका बजावली.

या खेळीदरम्यान अय्यरने ३६ चेंडूंचा सामना करत ५९ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ९ चौकार मारले. यासह जोफ्रा आर्चरच्या षटकात २ षटकार खेचले. तो या सामन्यात भारतीय संघासाठी मॅचविनर ठरला. दरम्यान सामना झाल्यानंतर अय्यरने मोठा खुलासा केला.

'मला मध्यरात्री फोन आला अन्...', सामन्यापूर्वी नेमकं काय घडलं? अय्यरचा मोठा खुलासा
Shreyas Iyer Record: हे फक्त श्रेयस अय्यरलाच जमलंय! कोणालाच न जमलेला रेकॉर्ड मोडून काढला

श्रेयस अय्यरला मध्य रात्री फोन आला अन् ...

श्रेयस अय्यरला इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. मात्र त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणार की नाही, याबाबत कुठलीही माहिती समोर आली नव्हती. श्रेयस अय्यरच्या सामन्यापूर्वी रात्री उशिरापर्यंत चित्रपट पाहत होता. त्यावेळी त्याला रोहितचा कॉल आला.

याबाबत बोलताना तो म्हणाला की, मी उशिरा रात्रीपर्यंत चित्रपट पाहत होतो. तेव्हा मला कर्णधार रोहित शर्माचा कॉल आला. तो मला म्हणाला की, कदाचित तुला खेळण्याची संधी मिळू शकते. कारण विराटच्या गुडघ्याला सुज आली आहे. त्यानंतर मी धावत माझ्या रुममध्ये गेलो आणि झोपून घेतलं.'

'मला मध्यरात्री फोन आला अन्...', सामन्यापूर्वी नेमकं काय घडलं? अय्यरचा मोठा खुलासा
IND vs ENG: सरस अय्यर! दमदार कमबॅक अन् पहिल्याच सामन्यात इंग्लिश गोलंदाजांना चोपून काढलं

दुसऱ्या वनडेत संधी मिळणार का?

यावरुन हे तर स्पष्ट झालंय की, भारतीय संघाचा श्रेयस अय्यरला खेळवण्याचा प्लान नव्हता. जर विराटला पहिल्या वनडेत खेळवलं असतं, तर श्रेयसला बाहेर बसावं लागलं असतं. नशिबाने श्रेयसला खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचं सोनं केलं.

या अर्धशतकानंतर त्याने आपलं संघातील स्थान निश्चित केलंय ? की भारतीय संघ विराट आल्यानंतर अय्यरला बाहेर बसवणार? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. विराट आल्यानंतर कितव्या क्रमांकावर खेळणार या प्रश्नामुळेही रोहितच्या डोकेदुखीत वाढ होणार आहे.

'मला मध्यरात्री फोन आला अन्...', सामन्यापूर्वी नेमकं काय घडलं? अय्यरचा मोठा खुलासा
IND vs ENG: नॉर्मल वाटलोय का? ४४५ दिवसांनंतर कमबॅक; शमीने रॉकेट बॉल टाकून मिडल स्टम्प उडवला- VIDEO

पहिल्या सामन्यात अशी होती भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com