kapil parmar twitter
Sports

Kapil Parmar ने रचला इतिहास! ज्युदोमध्ये भारताला मिळवून दिलं पहिलं मेडल; नरेंद्र मोदींनी दिला खास मेसेज

India at Paris Paralympics 2024: भारताचा स्टार खेळाडू कपिल परमारने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे.

Ankush Dhavre

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी सुरूच आहे. गुरुवारी (५ सप्टेंबर) भारताला आणखी एक पदक मिळालं आहे. कपिल परमारने पुरुषांचा ६० कीलोग्रम (J 1) वजनी गटातील ज्युदो क्रीडा प्रकारात कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. यासह त्याने इतिहास रचला आहे.

तो ज्युदोमध्ये भारतासाठी पदक जिंकणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात कपिल परमार आणि एलिल्टोन ओलिवेराला धूळ चारली. हे पदक भारताचं पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतील २६ वे पदक ठरले आहे.

असा जिंकला सामना

कपिल परमार सुरुवातीपासूनच ओलिवेरावर वरचढ दिसला. त्याने दमदार सुरुवात केली आणि शेवटही तसाच केला. यासह त्याने १०-० ने विजय मिळवत कांस्य पदकावर कब्जा केला.

J 1 कॅटेगरी म्हणजे काय?

पॅरालिम्पिक स्पर्धेत अपंगत्वाची कॅटेगरी ठरवण्यात आली आहे . J 1 कॅटेगरी म्हणजे जे खेळाडू दृष्टीहीन आहेत किंवा ज्यांना कमी दिसतं, अशा खेळाडूंचा या कॅटेगरीत समावेश केला जातो.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा

भारतासाठी ज्युदोमध्ये पहिलं पदक जिंकल्यानंतर कपिलवर कौतुकाचा वर्षाव केला जातोय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत त्याचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी लिहिलं की, ' खूपच शानदार कामगिरी आणि एक स्पेशल पदक. कपिल परमार ज्युदोमध्ये पदक जिंकणारा पहिलाच भारतीय ठरला आहे. पुरुषांचा ६० कीलोग्रम (J 1) वजनी गटातील ज्युदो क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल तुमचे अभिनंदन.'

लहानपणी घडली दुर्घटना

कपिल परमारबद्दल बोलायचं झालं, तर तो मध्य प्रदेशातील शिवोर या छोट्या गावात राहतो. लहानपणीच त्याच्यासोबत एक मोठी दुर्घटना घडली होती. शेतात गेला असताना, त्याला पाण्याच्या मोटरचा झटका बसला. या धक्क्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं, त्यावेळी तो ६ महिने कामामध्ये होता. त्याचे वडील टॅक्सी चालक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

SCROLL FOR NEXT