Virat Kohli Jasprit Bumrah x
Sports

MI VS RCB : भर मैदानात विराट कोहलीने बुमराहला धक्का दिला, मुंबई विरुद्ध बंगळुरू सामन्यात 'त्या' ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं?

Virat Kohli Jasprit Bumrah : वानखेडे स्टेडियमवर आज मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हा सामना रंगला आहे. या सामन्यादरम्यान सोशल मीडियावर विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Yash Shirke

जसप्रीत बुमराहने आयपीएलमध्ये पुनरागमन केले आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटी सामन्यात बुमराह दुखापतग्रस्त झाला होता. यामुळेच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळता आले नव्हते. आजच्या सामन्यातून बुमराहने मुंबई इंडियन्सच्या संघात पुन्हा एन्ट्री घेतली. मुंबई विरुद्ध बंगळुरू सामन्यादरम्यान विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांची मैदानात मज्जामस्ती पाहायला मिळाली.

नेमकं काय घडलं?

दहाव्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराह गोलंदाजी करण्यासाठी आला होता. त्यावेळेस रजत पाटीदार स्ट्राईकवर होता. बुमराहच्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर पाटीदारने शॉट मारला. त्यानंतर विराटने क्रीज सोडली. त्याच दरम्यान बुमराहने नॉन स्ट्राईकरच्या दिशेने बॉल थ्रो करण्याची ॲक्शन केली. त्यानंतर विराट कोहलीने बुमराहला गमतीने धक्का मारला, त्या दोघांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. मैदानावर दोघेही हसताना दिसले.

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विराट कोहली आणि फिल सॉल्ट दोघे फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. सॉल्ट लवकर आउट झाल्याने विराटने आधी देवदत्त पडिक्कल आणि नंतर रजत पाटीदारच्या साथीने खेळ पुढे नेला.

मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 -

विल जॅक्स, रायन रिकेल्टन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, विग्नेश पुथूर

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूची प्लेईंग 11 -

फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यात नगरपरिषद मतदार यादीत घोळ

Pune Police: पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, कुणाची कुठे झाली बदली? वाचा संपूर्ण लिस्ट

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

SCROLL FOR NEXT