jasprit bumrah twitter
Sports

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? बुमराहवर फेकी बॉलिंगचे आरोप! सोशल मीडियावर पेटला वाद

Ind vs Aus, Jasprit Bumrah Chucking: जसप्रीत बुमराहच्या शानदार गोलंदाजीनंतर नेटकऱ्यांनी बुमराहवर फेकी बॉलिंग केल्याचा आरोप केला आहे.

Ankush Dhavre

Jasprit Bumrah News In Marathi: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानावर सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्मा उपलब्ध नसल्याने नेतृत्वाची जबाबदारी जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आली आहे.

मालिकेतील पहिल्याच दिवशी बुमराहच्या घातक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी नांग्या टाकल्या. या डावात गोलंदाजी करताना त्याने ५ गडी बाद केले.

दरम्यान सोशल मीडियावर बुमराहच्या गोलंदाजी अॅक्शनवर चर्चा रंगायला सुरु झाली आहे. जसप्रीत बुमराह फेकी बॉलर असल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जातोय.

सोशल मीडियावर रंगली चर्चा

पर्थ कसोटीचा पहिला दिवस बुमराहने गाजवला. ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सळो की पळो करुन सोडत त्याने ५ गडी बाद केले. या दमदार गोलंदाजीच्या बळावर तो ऑस्ट्रेलियान वृत्तपत्रांच्या फ्रंट पेजवर झळकला.

जिकडे तिकडे बुमराहची हवा पाहायला मिळाली. दरम्यान काही युझर्स सोशल मीडियावर, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी अॅक्शन फेकी असल्याचा आरोप करत आहेत. युझर्सकडून त्याच्या गोलंदाजी अॅक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

पहिल्याच डावात घेतल्या ५ विकेट्स

या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना बुमराहने सर्वाधिक ५ गडी बाद केले. त्याने या डावात १८ षटक गोलंदाजी केली आणि ३० धावा खर्च करत ५ गडी बाद केले. या शानदार गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १०४ धावांवर आटोपला.

ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना कुठल्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. शेवटी फलंदाजी करताना मिचेल स्टार्कने सर्वाधिक २६ धावांची खेळी केली.

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना १५० धावा करता आल्या. भारतीय संघाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना नितीश कुमार रेड्डीने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली. तर रिषभ पंतने ३७ आणि केएल राहुलने २६ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train : मोठी बातमी! देशात आणखी ४ वंदे भारत ट्रेन सेवेत, जाणून घ्या तुमच्या शहरातून धावणार का?

पश्चिम महाराष्ट्रात राजकीय भूकंप! बड्या नेत्यानं सोडली शरद पवार गटाची साथ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पोला धडक; ४ जीवलग मित्रांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Apple cutting Tips: सफरचंद कापल्यानंतर काळे का पडतात?

SCROLL FOR NEXT