james anderson twitter
क्रीडा

James Anderson Retirement: 21 वर्ष 991 विकेट्स! लॉर्ड्सच्या मैदानावर जेम्स अँडरसनचा क्रिकेटला अलविदा

James Anderson News In Marathi: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ankush Dhavre

ज्या वयात क्रिकेटपटू निवृत्त होऊन समालोचन करताना दिसतात,त्याच वयात ४१ वर्षीय जेम्स अँडरसन फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरतोय. सहसा वेगवान गोलंदाज चाळीशी उलटल्यानंतर त्याच लयात गोलंदाजी करत नाही. मात्र २००३ पासून सुटलेल्या अँडरसन एक्स्प्रेसने वयाच्या ४१ व्या वर्षी आपल्या गाडीला ब्रेक लावला आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या अँडरसनने आपल्या कारकीर्दीचा शेवट याच मैदानावर केला आहे. २१ वर्ष ७०० हून अधिक गडी बाद करणाऱ्या जेम्स अँडरसनने क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.

जेम्स अँडरसनने २००३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. पहिल्याच सामन्यात गुष्र लोर्ड्सच्या मैदानावर ५ गडी बाद केले होते. वेगवान गोलंदाज म्हटलं की,दुखापत आलीच. मात्र आपल्या २१ वर्षांच्या कारकिर्दीत जेम्स अँडरसनला एकही मोठी दुखापत झाली नाही. त्याने आपल्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतली. हेच कारण होतं की, तो १०-१० षटकांचं स्पेल टाकू शकला.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळण्याचा रेकॉर्ड हा भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने २०० कसोटी सामने खेळले होते. दरम्यान जेम्स अँडरसनने आपल्या कारकिर्दीला १८८ कसोटी सामन्यानंतर पूर्णविराम दिला. आणखी १३ सामने खेळून तो सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडू शकला असता.

हा रेकॉर्ड मोडत आला नसला तरीदेखील त्याने कसोटी क्रिकेटमधील एक मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. शेवटच्या सामन्यात त्याने ४ गडी बाद केले. दरम्यान त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४० हजार चेंडू टाकण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. असा कारनामा करणारा तो जगातील पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला आहे. ३३,६९८ चेंडू टाकणारा स्टुअर्ट ब्रॉड या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

जेम्स अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९५० पेक्षा अधिक गडी बाद केले आहेत. त्याच्यासोबत खेळलेले खेळाडू आता कोचिंग करत आहेत. मात्र तो अजूनही इंग्लंड संघाचं प्रतिनिधित्व करत होता. अखेर शेवटच्या सामन्यात इंग्लंडने वेस्टइंडिजला १ डाव ११४ धावांनी पराभूत करत त्याला विजयी विदाई दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT