Gautam Gambhir Statement: 'खेळायचं असेल तर...', हेड कोच बनताच गौतम गंभीरची टीम इंडियाला वॉर्निंग

Gautam Gambhir On Team India: गौतम गंभीरची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान ही जबाबदारी स्वीकारताच गंभीरने भारतीय खेळाडूंना वॉर्निंग दिली आहे.
Gautam Gambhir Statement: 'खेळायचं असेल तर...', हेड कोच बनताच गौतम गंभीरची टीम इंडियाला वॉर्निंग
gautam gambhirsaam tv
Published On

भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरने ही जबाबदारी स्वीकारली आहे. भारतीय संघ या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. दरम्यान आपला कार्यकाळ सुरु होण्यापूर्वी गौतम गंभीरने भारतीय खेळाडूंना इशारा दिला आहे.

Gautam Gambhir Statement: 'खेळायचं असेल तर...', हेड कोच बनताच गौतम गंभीरची टीम इंडियाला वॉर्निंग
Gautam Gambhir: गंभीरच्या 'मेरी सुनो'ला BCCI चा रेड सिग्नल? आणखी एक मागणी फेटाळली

गौतम गंभीर हा आपल्या स्पष्ट वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. यापूर्वीही अनेकदा त्याने स्पष्ट वक्तव्य केली आहेत. त्याने स्पष्टपणे म्हटलं आहे की, एखादा खेळाडू जर फिट असेल, तर त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळायला हवं.

गौतम गंभीरने एका स्पोर्ट्स चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, जर तुम्ही खेळण्यासाठी सक्षम असाल , तर तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळायला हवं. तर एखादा खेळाडू दुखापतग्रस्त असेल, तर त्याने जावं आणि फिट होऊन पुन्हा कमबॅक करावं. एका खेळाडूने एकच फॉरमॅट खेळावं यावर माझा विश्वास नाही. खेळाडू जर दुखापतग्रस्त असेल, तर खेळाडूच्या दुखापतीवर उपाययोजना करु.'

तसेच तो पुढे म्हणाला की, ' प्रोफेशनल क्रिकेट खेळत असताना तुमचा कार्यकाळ हा खूप लहान असतो. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की त्याने जास्तीत जास्त सामने खेळावं. जर एखादा खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असेल, तर त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळावं.' राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर गंभीने हा पदभार सांभाळला आहे.

Gautam Gambhir Statement: 'खेळायचं असेल तर...', हेड कोच बनताच गौतम गंभीरची टीम इंडियाला वॉर्निंग
IND vs ZIM,3rd T20I: इथंच सामना फिरला.. शुभमन गिलने सांगितला भारत- झिम्बाब्वे सामन्यातील टर्निंग पॉईंट

सपोर्ट स्टाफमध्ये कोणाचा समावेश?

गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत असणार आहे. तर फलंदाजी प्रशिक्षक म्हणून अभिषेक नायरचं नाव आघाडीवर आहे. तर मॉर्ने मॉर्कल हा गौतम गंभीरला गौलंदाजी प्रशिक्षक म्हणून हवा असल्याचा दावा माध्यमातील वृत्तात केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com