Gautam Gambhir: गंभीरच्या 'मेरी सुनो'ला BCCI चा रेड सिग्नल? आणखी एक मागणी फेटाळली

Gautam Gambhir News In Marathi: भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
Gautam Gambhir: गंभीरच्या 'मेरी सुनो'ला BCCI चा रेड सिग्नल? आणखी एक मागणी फेटाळली
gautam gambhir with rohit sharmatwitter
Published On

आयसीसी टी -२० वर्ल्डकप झाल्यानंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. रिप्लेसमेंट म्हणून गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. मंगळवारी बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली. राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सपोर्ट स्टाफमधील सदस्य पारस म्हांब्रे, टी दिलीप आणि विक्रम राठोड यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ देखील संपला आहे.

Gautam Gambhir: गंभीरच्या 'मेरी सुनो'ला BCCI चा रेड सिग्नल? आणखी एक मागणी फेटाळली
IND vs ZIM,3rd T20I: इथंच सामना फिरला.. शुभमन गिलने सांगितला भारत- झिम्बाब्वे सामन्यातील टर्निंग पॉईंट

माध्यमातील वृत्तानुसार, असा दावा केला जात आहे की, टी दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून कायम राहू शकतात. तर फलंदाजी प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षकाची लवकरच नियुक्ती केली जाईल. ही जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी गौतम गंभीरने बीसीसीआयकडे सपोर्ट स्टाफ निवडण्याची अट ठेवली होती. मात्र बीसीसीआय गंभीरचं काहीच ऐकताना दिसून येत नाहीये. गौतम गंभीरला विनय कुमार गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून हवा आहे. मात्र बीसीसीआय नकार देत असल्याचं म्हटलं जात आहे.

Gautam Gambhir: गंभीरच्या 'मेरी सुनो'ला BCCI चा रेड सिग्नल? आणखी एक मागणी फेटाळली
IND vs ZIM 3rd T20I: गिल-वॉशिंग्टनने मिळवून दिला 'सुंदर' विजय; हरारेमध्ये झिम्बाब्वेचा २३ धावांनी पराभव

गौतम गंभीरला क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून जॉन्टी रोड्स हवा आहे. दरम्यान हिंदुस्तान टाइम्सच्या एका वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की, बीसीसीआयने गौतम गंभीरची ही मागणी देखील फेटाळून लावली आहे. कारण बीसीसीआयला परदेशी प्रशिक्षक नको आहे. जॉन्टी रोड्स दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू असून त्याने लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे. हे दोघेही सपोर्ट स्टाफमध्ये एकत्र होते.

या वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की, जॉन्टी रोड्सच्या नावाची चर्चा झाली होती. मात्र बीसीसीआयला सपोर्ट स्टाफमधील सदस्य भारतीय हवे आहेत. त्यामुळे टी दिलीप पुन्हा एकदा भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होऊ शकतात. तर फलंदाजी प्रशिक्षक म्हणून भारतीय संघाचा माजी खेळाडू अभिषेक शर्माचं नाव चर्चेत आहे. बीसीसीआयने गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जहीर खान आणि लक्ष्मीपती बाालाजीचं नाव सुचवलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com