IND vs ZIM 3rd T20I: गिल-वॉशिंग्टनने मिळवून दिला 'सुंदर' विजय; हरारेमध्ये झिम्बाब्वेचा २३ धावांनी पराभव

IND vs ZIM 3rd T20I : पाच टी२० सामन्याच्या मालिकेत भारताच्या युवा संघाने तिसऱ्या टी२० सामन्यात यजमान झिम्बाव्बे संघाचा धुव्वा उडवलाय.
IND vs ZIM 3rd T20I: गिल-वॉशिंग्टनने मिळवून दिला 'सुंदर' विजय; हरारेमध्ये झिम्बाब्वेचा २३ धावांनी पराभव
IND vs ZIM 3rd T20I

भारतीय संघ आणि झिम्बाब्वेच्या संघात ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना टीम इंडियाने २३ धावांनी जिंकलाय. या मालिकेतील तिसरा सामना हरारेच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने यजमान संघाचा दारुण पराभव केला. या विजयासह भारताने पाच टी२० सामन्याच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतलीय.

हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून कर्णधार गिलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने २० षटकात १८२ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या झिम्बाब्वे संघाचा निम्मा संघ ३९ धावांवर बाद झाला. मात्र, मायर्सच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर या सामन्यातील लाजिरवाणा पराभव टाळण्यात संघाला यश आलं. झिम्बाब्वे संघाला २० षटकांत ६ गडी गमावून १५९ धावांपर्यंतच मजल मारता आली. टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदरने गोलंदाजीत सर्वाधिक ३ बळी घेतले.

सुरुवातीलाच विकेट जास्त पडल्यामुळे झिम्बाब्वेचा संघ दबावात फलंदाजी करू लागला होता. त्याच परिणाम अख्खा संघ फक्त १५९ धावा करू शकला. १८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वे संघाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने १९ धावांपर्यंत पहिले ३ विकेट गमावल्या. पहिल्या ६ षटकांच्या अखेरीस झिम्बाब्वेची धावसंख्या ३७ धावा होती. यानंतर धावसंख्या ३९ होईपर्यंत निम्मा संघ तंबूत परतला होता.

झिम्बाब्वेचा डाव डिओन मायर्स आणि क्लाइव्ह मदांदे यांनी सांभाळला. या दोघांनी १० षटकांअखेर संघाची धावसंख्या ६० धावांपर्यंत नेली. मदांदे आणि मायर्स यांच्यात सहाव्या विकेटसाठी ५७ चेंडूत ७७ धावांची भागीदारी झाली. या सामन्यात मदांदेने २६ चेंडूत ३७ धावांची खेळी करत वॉशिंग्टन सुंदरचा बळी ठरला.

डिओन मायर्सने एका बाजूकडून धावा करत राहिला.परंतु तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. या सामन्यात मायर्सने आपल्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतकही झळकावलं. वॉशिंग्टन सुंदरने भारतीय संघासाठी गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली. त्याने ४ षटकात १५ धावा देत ३ बळी घेतले. तर आवेश खानने २ आणि खलील अहमदला १ बळी घेण्यात यश आलं.

IND vs ZIM 3rd T20I: गिल-वॉशिंग्टनने मिळवून दिला 'सुंदर' विजय; हरारेमध्ये झिम्बाब्वेचा २३ धावांनी पराभव
IND vs ZIM: मुकेश कुमार आणि आवेश खानच्या भेदक गोलंदाजीसमोर झिम्बाब्वे ढेर; १०० धावांनी टीम इंडियाचा विजय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com