Ishan Kishan Saam Tv
Sports

IND vs SA Test: कसोटी मालिकेतील संघात का झाला बदल? इशानच्या जागी केएस भरतला का आणलं?

Ishan Kishan : यावर्षीच इशान किशनने कसोटीत पदार्पण केलं होतं. जुलैमध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. तो फक्त दोन कसोटी सामने खेळलाय. त्याने ७८ च्या सरासरीने एकूण ७८ धावा केल्या आहेत.

Bharat Jadhav

Ishan Kishan withdraws fromIND vs SA Test series :

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियामध्ये मोठा बदल करण्यात आलाय. इशान किशनच्या जागी के.एस. भरतचा कसोटी संघात समावेश करण्यात आलाय. केएस भरतला घेण्यामागे काय कारण आहे, याचा खुलासाही बीसीसीआयने केला आहे. (Latest News)

इशान किशनने यावर्षीच कसोटीत पदार्पण केलं होतं. जुलैमध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. आतापर्यंत तो फक्त दोन कसोटी सामने खेळलाय. त्याने ७८ च्या सरासरीने एकूण ७८ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर अर्धशतकही आहे. त्याचवर्षी केएस भरतलाही कसोटी कॅप मिळाली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर कसोटीत त्याने पहिला कसोटी सामना खेळला होता. केएस भरतने आतापर्यंत पाच कसोटी सामने खेळलेत. यात त्याने १८.४२ च्या सरासरीने १२९ धावा केल्या आहेत. तसेच यष्टिरक्षक म्हणून तो खूप प्रभावी ठरलाय आहे. या ५ कसोटी सामन्यांमध्ये त्याने १२ झेल आणि एक स्टंपिंग केले आहे.

का झाला बदल

कसोटी मालिकेतील संघात झालेला बदल हा इशान किशनच्या विनंतीवरून करण्यात आलाय. इशान किशनने वैयक्तिक कारणांचा हवाला देत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून मुक्त करण्याची विनंती बीसीसीआयला केलीय. बीसीसीआयने त्याची विनंती मान्य करत, त्याला मुक्त केलं आहे. त्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी त्याच्या जागी यष्टिरक्षक केएस भरतचा समावेश करण्यात आलाय. विकेटकीपिंगसाठी केएस भरत हा केएल राहुलसाठी पर्याय असेल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टीम इंडियाचा कसोटी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, कृष्णा कृष्णा, के.एस. (यष्टीरक्षक).

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Almond Benefits: हिवाळ्यात खा पाण्यात भिजवलेले बदाम , मेंदू होईल कॉम्प्युटरपेक्षा फास्ट

Ladki Bahin Yojana: 18 नोव्हेंबरनंतर लाडकी बहीण योजना बंद? खर्च सरकारला परवडेना? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Bihar Election Result Live Updates: एनडीएने बहुमताचा आकडा ओलांडला, कोण किती जागांवर आघाडीवर?

Maharashtra Live News Update: नवले ब्रीज अपघात प्रकरणी गुन्हा दाखल, तिघांवर गुन्हा दाखल

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेला फिरकीच्या जाळ्यात गुंडाळणार; टीम इंडिया मैदानावर उतरवणार ४ हुकुमी एक्के

SCROLL FOR NEXT