Ankush Dhavre
जेव्हा चेंडू फलंदाजाच्या बॅटला लागुन हवेत जातो आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली पडायच्या आत चेंडू पकडतो त्यावेळी फलंदाज बाद होतो.
जेव्हा फलंदाज चेंडू पॅडला लागतो आणि फलंदाज तिन्ही स्टम्पच्या समोर असतो त्यावेळी फलंदाजाला बाद घोषित केलं जाऊ शकत.
जेव्हा चेंडू थेट स्टम्पला जाऊन धडकतो त्यावेळी फलंदाजाला बाद घोषित केलं जातं.
जेव्हा फलंदाज शॉट खेळण्याच्या नादात क्रिझच्या बाहेर जातो त्यावेळी यष्टिरक्षक स्टम्प उडवतो त्यावेळी फलंदाज बाद होतो.
जेव्हा फलंदाज धाव घेत असतो आणि धाव पूर्ण करण्याआधीच जेव्हा क्षेत्ररक्षक स्टम्प उडवतो त्यावेळी फलंदाज रन आउट होतो.
शॉट खेळण्याच्या नादात जेव्हा फलंदाजाच्या शरीराचा कुठलाही भाग किंवा बॅट स्टम्पला लागताच फलंदाज हिट विकेट होऊन बाद होतो.
जेव्हा फलंदाज दुसऱ्यांदा शॉट खेळण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी देखील फलंदाजाला बाद घोषित केलं जात.
जेव्हा फलंदाज क्षेत्ररक्षकाच्या मध्ये येतो त्यावेळी फलंदाजाला बाद घोषित केलं जातं.
फलंदाज बाद होताच दुसऱ्या फलंदाजाला ३ मिनिटांच्या आत मैदानात येणं गरजेचं आहे. फलंदाजाने उशीर केल्यास त्याला टाईम आऊट बाद घोषित केलं जातं
जेव्हा एखादा फलंदाज अंपायरला न सांगता बाहेर जातो त्यावेळी अंपायर त्याला बाद घोषित करू शकतो.