Ishan Kishan Wicket Controversy X
Sports

IPL 2025 : दाल में कुछ काला है! Ishan Kishan च्या विकेटवर यांनाही शंका; पाकिस्तानी खेळाडूने लावला मॅच फिक्सिंगचा आरोप

Ishan Kishan Wicket Controversy : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना काल एकाना स्टेडियमवर रंगला. यात इशान किशनच्या विकेटची चर्चा पाहायला मिळाली. त्याच्या विकेटनंतर आता सोशल मीडियावर मॅच फिक्सिंगच्या चर्चा रंगल्या आहेत.

Yash Shirke

SRH VS MI IPL 2025 : आयपीएल २०२५ मधील ४१ वा सामना काल सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात इशान किशन फक्त १ धाव करुन तंबूत परतला. बॅटची एज चेंडूला लागली नसतानाही इशानने क्रीज सोडली. दीपक चहरच्या अपीलनंतर अंपायर्संनी इशान आउट आहे अशी घोषणा केली. या सर्व प्रकरणात अंपायरचा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. एकूण प्रकारामुळे कालच्या सामन्यात फिक्सिंग झाली अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या.

सोशल मीडियावर हैदराबाद विरुद्ध मुंबईची मॅच फिक्स होती असे अनेक मीम्स, पोस्ट व्हायरल झाले. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जुनैद खानने देखील इशान किशनच्या वादग्रस्त विकेटवर कमेंट केली आहे. त्याने इशानच्या विकेटचा व्हिडीओ एक्सवर पोस्ट करताना त्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये 'दाल में कुछ काला है' असे म्हटले. त्याच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे.

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना काल एकाना स्टेडियमवर खेळला गेला. टॉस जिंकत हार्दिक पंड्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ट्रेव्हिस हेड शून्यावर बाद झाला. त्याच्या जागी आलेला इशान किशन देखील लवकर बाद झाला. त्याच्या विकेटच्या वेळी मैदानात प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला.

नेमकं काय झालं?

दीपक चहर तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आला. ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर इशानने शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू थेट विकेटकिपरच्या हातात गेला. अंपायरने सुरुवातीला वाइडचा कॉल दिला. पण इशान किशन क्रीज सोडून जाऊ लागला, तेव्हा चहरने अपील केल्यानंतर अंपायरने किशनला आउट घोषित केले. नंतर जेव्हा रिप्ले दाखवण्यात आला, तेव्हा इशानच्या बॅटला चेंडूचा स्पर्श झाला नसल्याचे समोर आले. इशान किशनचा परतण्याचा निर्णय आणि अंपायरने चुकीचा कॉल यामुळे हा सामना फिक्स होता अशा चर्चा सुरु झाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT