Rohit Sharma fitness concerns for ODI World Cup 2027 saam tv
Sports

Rohit Sharma: रोहित शर्माची २०२७ वर्ल्डकपमधील जागा धोक्यात? माजी मुख्य निवडकर्त्याचे खळबळजनक वक्तव्य

Rohit Sharma fitness concerns for ODI World Cup 2027: सबा करीम यांनी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या २०२७ वनडे वर्ल्डकपमधील स्थानावर मत व्यक्त केले आहे. कोहलीचा फॉर्म आणि फिटनेस त्याला जवळपास निश्चित करतो, तर रोहित शर्माला सातत्य आणि फिटनेसवर मेहनत घ्यावी लागणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

पुढच्या वर्षी म्हणजे २०२७ मध्ये वनडे वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. या वर्ल्डकपमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार का हा प्रश्न सर्वांसमोर आहे. टीममधील दोन दिग्गज खेळाडूंचं 2027 वर्ल्डकपमधील स्थानाबाबत माजी भारतीय क्रिकेटपटू सबा करीम यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय. सबा करीम यांच्या मते, विराट कोहलीने आपल्या कामगिरी आणि तंदुरुस्तीच्या जोरावर 2027 वर्ल्डकपची दावेदारी जवळपास निश्चित केलीये. मात्र रोहित शर्माला अजूनही सिलेक्टर्सचा पूर्ण विश्वास मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

पीटीआयशी बोलताना सबा करीम म्हणाले की, रोहित शर्माने त्याच्या फिटनेससोबतच मैदानावरील कामगिरीतही सातत्य दाखवणं आवश्यक आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये निवड समिती रोहितच्या फिटनेसवर आणि फलंदाजीतील कामगिरीवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे. त्यानंतरच 2027 वर्ल्डकपच्या नियोजनात त्याचा समावेश असेल की नाही याचा अंतिम निर्णय घेतला जाईल.

दुसरीकडे, विराट कोहलीबाबत बोलताना सबा करीम यांनी त्याचं भरभरून कौतुक केलंय. त्यांनी सांगितलं की, विराटने आपल्या खेळातून तसंच उत्कृष्ट फिटनेसमधून आणि चांगल्या कामगिरीने टीमसाठी स्वतःचं महत्त्व सिद्ध केलंय. त्यामुळे आता त्याला सिलेक्टर्ससमोर काहीही सिद्ध करण्याची गरज नाही.

करीम यांच्या मते, सध्या या दोन्ही वरिष्ठ खेळाडूंची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. विराट कोहली सातत्याने चांगली कामगिरी करतोय तर रोहित शर्माला पुन्हा एकदा त्याच्या खेळात सातत्य आणण्याचं मोठं आव्हान आहे.

दोघांच्या कामगिरीतील फरक

आयपीएल 2026 सिझनमध्येही या दोघांच्या कामगिरीतील फरक स्पष्टपणे दिसून आला. विराट कोहलीने आरसीबीकडून खेळताना 675 रन्स केले. यावेळी त्याने टीमला आयपीएल जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याउलट रोहित शर्मासाठी हा सिझन अपेक्षेप्रमाणे झाला नाही. त्याने या सिझनमध्ये केवळ 283 रन्स केले आहेत.

विराटच्या कामगिरीबद्दल बोलताना सबा करीम म्हणाले की, काळानुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची त्याची क्षमता हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. विराट सातत्याने त्याच्या खेळात सुधारणा करत असतो. विशेषतः टी-20 क्रिकेटमध्ये त्याने स्ट्राइक रेट वाढवून क्रिकेटच्या गरजेनुसार स्वतःमध्ये बदल केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना शिंदे गट नेते खासदार श्रीकांत शिंदे यांचा शिवसंवाद नंदुरबार दौरा

माजी मंत्र्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, महाराष्ट्राच्या राजकारणात शोककळा

K Annamalai : भाजपला मोठा धक्का, के. अन्नामलाई यांचा राजीनामा; नव्या राजकीय पक्षाची घोषणा

Peddi movie: 'राम चरण तिच्याकडे वासनेच्या नजरेने...'; जान्हवी कपूरचा 'ग्लॅमरस शो-पीस' म्हणून वापर, चाहते इतके का संतापले?

Political News: मुंख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, कॅबिनेट मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT