

आयपीएल २०२६ चा ४७ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आज, सोमवारी होत आहे. या सामन्याआधीच रोहित शर्माबाबत मोठी अपडेट आली आहे. रिपोर्ट्सनुसार, लखनऊविरुद्धच्या सामन्यात खेळायचं किंवा नाही याबाबतचा निर्णय मुंबई इंडियन्सनं रोहित शर्मावरच सोपवला आहे. त्यामुळे आता खेळायचं की नाही हे रोहित शर्मालाच ठरवावं लागणार आहे.
मुंबई इंडियन्सला कर्णधारपदी असताना पाच ट्रॉफी जिंकून देणारा आणि संघाचा कणा म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा सध्या दुखापतीमुळं त्रस्त आहे. मागील काही सामन्यांपासून तो प्लेइंग ११ मध्ये नाही. हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळं तो सध्या खेळत नाही. मागील दोन ते तीन सामन्यात तो खेळणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आज, सोमवारी लखनऊविरुद्ध महत्वाचा सामना होत आहे.
या सामन्यात रोहित मैदानात उतरणार का? असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. त्याचवेळी मुंबई इंडियन्सनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. सामन्याच्या आधी रोहितची फिटनेस टेस्ट होणार असल्याचे रिपोर्ट्स आहेत. रोहित शर्मा फिट असेल तर तो आजच्या सामन्यात खेळू शकतो, असे सांगितले जात आहे.
मुंबई इंडियन्ससाठी चांगली बाब म्हणजे रोहित शर्माने नेटमध्ये कसून सराव केला आहे. त्यामुळे तो आज खेळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, लखनऊ सुपर जायंट्सविरोधात खेळायचं की नाही याचा निर्णय स्वतः रोहित शर्मालाच घ्यावा लागणार आहे. मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनानं हा निर्णय रोहितवर सोपवल्याचे रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले.
रोहित शर्मा जर आजच्या सामन्यात खेळला तर, मुंबई इंडियन्ससाठी चांगले संकेत आहेत. त्यामुळे संघात बदल होण्याची शक्यता आहे. रॉबिन्स मिन्ज याला बाकावर बसावं लागेल. रोहितचा संघात समावेश झाला तर, फलंदाजी क्रमातही बदल होऊ शकतो. रोहित शर्मा आणि रिकल्टन हे दोघे सलामीला येण्याची शक्यता असून, विल जॅक्स हा फर्स्ट डाउनला फलंदाजीला उतरू शकतो.
आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्स आतापर्यंत ९ सामने खेळला आहे. त्यातील फक्त ४ सामन्यांत रोहित शर्मा खेळला आहे. म्हणजेच गेल्या पाच सामन्यांत तो संघात नाही. रोहितने चार सामन्यांत १६५.०६ च्या स्ट्राइक रेट आणि ४५ हून अधिकच्या सरासरीने १३७ धावा केल्या आहेत. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.