IPL च्या मागच्या सीझनमध्ये सनरायजर्स हैदराबादने लखनऊ सुपर जायंट्सचा दारुण पराभव केला होता. सामना संपल्यानंतर लखनऊचे मालक संजीव गोएंका आणि तेव्हाचा लखनऊचा कर्णधार केएल राहुल यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून संजीव गोएंका राहुलला ओरडत असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. तेव्हा मैदानावर नेमकं काय घडलं होतं याचा खुलासा लखनऊच्या एका माजी खेळाडूने केला आहे.
भारताचा माजी फिरकीपटू अमित मिश्रा हा आयपीएल २०२४ मध्ये लखनऊकडून खेळत होता. त्याने संजीव गोएंका आणि केएल राहुलमध्ये झालेल्या संभाषणावर प्रकाश टाकला. तो म्हणाला, 'मी मागच्या सीझनमध्ये प्रशिक्षकाशी चर्चा केली. मागच्या वर्षी केएल राहुल सर्वकाही पाहत होता. तो प्लेईंग ११ ठरवत होता. संघातील बदल, नियोजन तोच करत होता, असे मला प्रशिक्षकांनी सांगितले होते. यावर्षी वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. झहीर खान आला आहे, तो सर्वांशी बोलत आहे.'
संजीव गोएंका आणि केए राहुल यांच्यात काय बोलणं झालं होतं?
अमित मिश्रा म्हणाला, "मला वाटतं की मीडियाने सतत तीच गोष्ट दाखवून ते मोठं केलं. ज्याप्रमाणे दाखवले जात होतं, तसं काहीच घडत नव्हतं. 'तुम्ही सामना गमावलात ठिक आहे, पण त्या पराभवानंतर पुन्हा लढा द्यायला तयार व्हा. लढून हरलात तर मला काहीच हरकत नाही' असे ते (संजीव गोएंका) म्हणाले होते. लोकांनी मला हेच सांगितलं आणि हेच घडलं. कोलकाता आणि हैदराबाद विरुद्ध पराभव झाल्यानंतरही ते ड्रेसिंग रुममध्ये आले आणि त्यांनी संघाला प्रेरणा दिली. त्यांनी कधीही कुणालाही काहीही चुकीचे म्हटले नाहा ते कधीही कोणाशीही मोठ्या स्वरात बोलले नाही."
आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये लखनऊने केएल राहुलला रिलीज केले. दिल्ली कॅपिटल्सने राहुलला आपल्या ताफ्यात सामील केले. त्यानंतर लखनऊने सर्वाधिक म्हणजेच २७ कोटी रुपयांची बोली लावून रिषभ पंतला संघात घेतले. त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी देखील पंतकडे देण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.