IPL 2025 : विराट कोहली-केएल राहुल भिडले, 'या' किरकोळ गोष्टीमुळे मैदानात राडा घातला; पण चूक नक्की कुणाची?

Virat Kohli-KL Rahul : अरुण जेटली स्टेडियमवर काल (२७ एप्रिल) रोजी दिल्ली विरुद्ध बंगळुरू हा सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यात मोठा वाद झाला.
Virat Kohli-KL Rahul
Virat Kohli-KL Rahul X
Published On

IPL 2025 मधील ४६ व्या सामन्यामध्ये दिल्ली आणि बंगळुरू हे दोन संघ आमनेसामने आले. १६२ धावांचे दिल्लीने आव्हान गाठताना आरबीसीची फलंदाजी सुरु होती. तेव्हा विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यात जोरदार वाद झाला. ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सामना संपल्यानंतर दोघे पुन्हा एकत्र आले खरे पण सामन्यातल्या त्यांच्या वादाची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळाली.

रिअल-टाइम फुटेजमध्ये विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यांत का वाजलं हे अस्पष्ट असलं तरी, भारताचा माजी क्रिकेटपटू पियुष चावलाने या वादामागील कारण स्पष्ट केले. हा वाद फिल्ड सेट करताना झाला असल्याचा दावा चावलाने केला. तो म्हणाला 'दिल्लीने फिल्ट सेट करताना बराच वेळ घेतला, त्यामुळे विराट कोहली नाराज झाला. विराटने केएल राहुलकडे याबद्दल तक्रार केली.'

Virat Kohli-KL Rahul
'..तुम्ही नालायक, बिनकामाचे आहात'; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, पहलगाम हल्ल्यावरुन भारतीय सैन्यावर केली टीका

'विराटच्या बोलण्याने राहुल संतापला, फिल्ट सेट करताना जास्त वेळ गेला तर स्लो ओव्हर रेटमुळे आम्हाला पेनल्टी बसेल, तू त्याची काळजी करु नको' असे राहुलने म्हटल्याचा अंदाज पियुष चावलाने व्यक्त केला. दरम्यान विराट आणि राहुल यांच्यामध्ये वाद नक्की कोणत्या कारणामुळे झाला यामागील खरं कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

Virat Kohli-KL Rahul
एका धावेची किंमत २४ लाख; पण सामन्यात असं काही होतंय की शेवटी रिषभचा खिसा रिकामाच, प्रकरण काय?

प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाने १६२ धावा केल्या. १६३ धावांचे लक्ष गाठण्यासाठी आरसीबीचे फलंदाज मैदानात उतरले. दुसऱ्या इनिंग्सच्या सुरुवातीलाच दिल्लीने बंगळुरूचे ३ गडी बाद केले. विराट कोहली आणि कृणाल पंड्या यांनी संयमी खेळ केला आणि धावसंख्या पुढे नेली. परिस्थितीला अनुसरून त्यांनी खेळ पुढे नेला. कोहली बाद झाल्यानंतर कृणालने टीम डेव्हिडच्या साथीने आरसीबीचा विजय निश्चित केला.

Virat Kohli-KL Rahul
Virat Kohli : 'त्या' कृत्यानंतरही विराट नॉट-आउट कसा? व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com