IPL Retention 2026 saam tv
Sports

IPL Retention 2026: आयपीएलमध्ये सर्व टीम्सची रिटेंशन लिस्ट जाहीर; पाहा कोणत्या टीममधून कोणता खेळाडू रिलीज?

IPL 2026 Retention Players List: सर्व १० आयपीएल फ्रँचायझींनी त्यांच्या रिटेन्शन यादीची घोषणा केली आहे. या घोषणेने अनेक खेळाडूंचे भविष्य निश्चित झाले असून, काही मोठ्या नावांना त्यांच्या रिलीज करण्यात आलंय.

Surabhi Jayashree Jagdish

इंडियन प्रीमियर लीग 2026 साठी खेळाडूंचं मिनी ऑक्शन 16 डिसेंबर रोजी अबूधाबीमध्ये होणार आहे. त्याआधी सर्व 10 टीम्सना आपापली रिटेन्शन यादी जाहीर करणं आवश्यक होतं. यासाठी अंतिम मुदत 15 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली होती. सर्व टीम्सने आपली यादी जाहीर केली असून अनेक मोठे बदल दिसून आले आहेत.

चेन्नई सुपर किंग्स

चेन्नईने सर्वाधिक 11 खेळाडूंना रिलीज केलंय. यामध्ये विदेशी खेळाडू रचिन रवींद्र, डेवोन कॉन्वे, मथीशा पथिराना आणि सॅम करन यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे वंश बेदी, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, शेख रशीद, सी. आंद्रे सिद्धार्थ, कमलेश नागरकोटी आणि विजय शंकर यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर एम.एस. धोनी, कर्णधार ऋतुराज गायकवाड, डेवाल्ड ब्रेविस आणि गुरजपनीत सिंह यांना रिटेन केलंय.

कोलकाता नाईट रायडर्स

केकेआरने वेंकटेश अय्यर (23.75 कोटी), आंद्रे रसेल (12 कोटी), क्विंटन डिकॉक (3.6 कोटी), मोईन अली (2 कोटी) आणि एनरिक नॉर्किया (6.5 कोटी) यांसारख्या स्टार खेळाडूंना रिलीज केलं. रहमानुल्लाह गुरबाज, स्पेंसर जॉनसन, लवनिथ सिसोदिया आणि चेतन सकारिया यांनाही टीममधून वगळण्यात आलंय.

मुंबई इंडियन्स

मुंबईने चार परदेशी खेळाडू लिजाद विलियम्स, मुजीब उर रहमान, बेवोन जेकब्स आणि रीस टॉप्ली यांना रिलीज केलंय. तर विघ्नेश पुथुर, वी. सत्यनारायण राजू, के.एल. श्रीजीत आणि कर्ण शर्मा यांनाही टीममधून काढण्यात आलंय. त्याचप्रमाणे अर्जुन तेंडुलकरला लखनऊ सुपर जायंट्सकडे ट्रेड करण्यात आलंय.

राजस्थान रॉयल्स

रवींद्र जडेजा टीममध्ये आल्याने राजस्थानमध्ये कर्णधारपदाची स्पर्धा रंगणार आहे. रॉयल्सने फजलहक फारूकी, वानिंदु हसारंगा आणि महीश तीक्ष्णा यांना रिलीज केलंय. भारतीय खेळाडूंमध्ये आकाश मधवाल, अशोक शर्मा, कुणाल राठौर आणि कुमार कार्तिकेय यांना बाहेर करण्यात आलंय.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

आरसीबीने मयंक अग्रवाल, स्वास्तिक चिकारा, टिम सेफर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, मनोज भंडागे, लुंगी एनगिडी, ब्लेसिंग मुजारबानी आणि मोहित राठी यांना रिलीज केलंय.

पंजाब किंग्स

पंजाबने ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल, जोश इंगलिस, एरॉन हार्डी, कुलदीप सेन आणि प्रवीण दुबे यांना टीममधून रिलीज केलंय.

सनरायजर्स हैदराबाद

हैदराबादने अभिनव मनोहर, अथर्व तायडे, सचिन बेबी, वियान मुल्डर, सिमरजीत सिंह, राहुल चाहर आणि एडम झम्पा यांना रिलीज केलंय.

लखनऊ सुपर जायंट्स

एलएसजीने आकाश दीप, रवि बिश्नोई, आर्यन जुयाल, डेविड मिलर, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर आणि शमर जोसेफ यांना टीमतून वगळलंय.

गुजरात टायटन्स

गुजरातने पाच खेळाडूंना रिलीज केलं असून त्यात गेराल्ड कोएट्झी, करीम जनत, महिपाल लोमरोर, कुलवंत खेजरोलिया आणि दासुन शनाका यांचा समावेश आहे.

दिल्ली कॅपिटल्स

दिल्लीने फाफ डु प्लेसिस, जेक फ्रेजर मॅकगर्क, सेदिकुल्लाह अटल, मनवंत कुमार, मोहित शर्मा आणि दर्शन नालकंडे यांना रिलीज केलं आहे.

रिटेंशननंतर कशा आहेत सर्व टीम्स?

राजस्थान रॉयल्स

यशस्वी जैयस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वैभव सूर्यवंशी, शुभम दुबे, युद्धवीर सिंह, संदीप शर्मा, तुषार देशपांडे, शिमरॉन हेटमायर, लुआन-ड्रे प्रीटोरियस, जोफ्रा आर्चर, क्वेना मफाका, नांद्रे बर्गर, रवींद्र जडेजा (चेन्नईकडून ट्रेड), सॅम करन (चेन्नईकडून ट्रेड), डोनोवन फरेरा (दिल्लीकडून ट्रेड).

चेन्नई सुपर किंग्स

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, एम.एस. धोनी, डेवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल, शिवम दुबे, जेमी ओवर्टन, रामकृष्ण घोष, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कम्बोज, गुरजपनीत सिंह, श्रेयस गोपाल, मुकेश चौधरी, नाथन एलिस, संजू सॅमसन (राजस्थानकडून ट्रेड).

मुंबई इंडियन्स

हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रयान रिकेल्टन, रॉबिन मिंज, मिचेल सेंटनर, कॉर्बिन बॉश, नमन धीर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अल्लाह गजनफर, अश्विनी कुमार, रघु शर्मा, राज बावा, दीपक चाहर, विल जॅक्स, शेरफेन रदरफोर्ड (गुजरातकडून ट्रेड), मयंक मार्कंडेय (कोलकाताकडून ट्रेड), शार्दुल ठाकुर (लखनऊकडून ट्रेड).

पंजाब किंग्स

प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंह, नेहल वढेरा, मार्कस स्टोइनिस, अजमतुल्लाह उमरजई, मार्को जानसेन, हरप्रीत बराड, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, मुशीर खान, प्याला अविनाश, हरनूर पन्नू, सूर्यांश शेडगे, मिचेल ओवेन, जेवियर बार्टलेट, लॉकी फर्ग्युसन, वैशाक विजयकुमार, यश ठाकुर, विष्णु विनोद.

दिल्ली कॅपिटल्स

अक्षर पटेल (कर्णधार), के.एल. राहुल, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, करुण नायर, समीर रिजवी, आशुतोष शर्मा, विप्रज निगम, माधव तिवारी, त्रिपुराना विजय, अजय मंडल, कुलदीप यादव, मिचेल स्टार्क, टी. नटराजन, मुकेश कुमार, दुष्मंथा चमीरा, नीतीश राणा (राजस्थानकडून ट्रेड).

सनरायजर्स हैदराबाद

पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, स्मरण रविचंद्रन, ईशान किशन, हेनरिक क्लासेन, नीतीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कामिंदु मेंडिस, हर्षल पटेल, ब्रायडन कार्स, जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा, जीशान अंसारी.

कोलकाता नाईट रायडर्स

अजिंक्य रहाणे (कर्णधार), सुनील नरेन, रिंकू सिंह, अंगकृष रघुवंशी, मनीष पांडे, वरुण चक्रवर्ती, रमनदीप सिंह, अनुकूल रॉय, रोवमन पॉवेल, हर्षित राणा, वैभव अरोरा, उमरान मलिक.

गुजरात टायटन्स

शुभमन गिल (कर्णधार), राशिद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरुख खान, कगिसो रबाडा, जोस बटलर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, निशांत सिंधु, कुमार कुशाग्र, अनुज रावत, मानव सुथार, वॉशिंगटन सुंदर, अरशद खान, गुरनूर बराड, साई किशोर, ईशांत शर्मा, जयंत यादव, ग्लेन फिलिप्स.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या, स्वप्निल सिंह, टिम डेविड, रोमारियो शेफर्ड, जैकब बेथेल, जोश हेजलवुड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिख सलाम डार, अभिनंदन सिंह, सुयश शर्मा.

लखनऊ सुपर जायंट्स

ऋषभ पंत (कर्णधार), अब्दुल समद, आयुष बदोनी, एडेन मार्करम, मॅथ्यू ब्रीट्जके, हिम्मत सिंह, निकोलस पूरन, मिचेल मार्श, शाहबाज अहमद, अर्शिन कुलकर्णी, मयंक यादव, आवेश खान, मोहसिन खान, मणिमारन सिद्धार्थ, दिग्वेश राठी, प्रिंस यादव, आकाश सिंह, अर्जुन तेंडुलकर (मुंबईकडून ट्रेड), मोहम्मद शमी (हैदराबादकडून ट्रेड).

रिटेन्शननंतर सर्व टीम्सच्या पर्समध्ये किती रक्कम उरलीये?

  • दिल्ली कॅपिटल्स – 21.8 कोटी रुपये

  • रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू – 16.4 कोटी रुपये

  • पंजाब किंग्स – 11.5 कोटी रुपये

  • लखनऊ सुपर जायंट्स – 22.95 कोटी रुपये

  • गुजरात टायटन्स – 12.9 कोटी रुपये

  • चेन्नई सुपर किंग्स – 43.4 कोटी रुपये

  • कोलकाता नाईट रायडर्स – 64.3 कोटी रुपये

  • सनरायजर्स हैदराबाद – 25.5 कोटी रुपये

  • मुंबई इंडियन्स – 2.75 कोटी रुपये

  • राजस्थान रॉयल्स – 16.05 कोटी रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईतील नेव्हल डॉकयार्डवर दहशतवादी हल्ल्याची धमकी, आंध्र प्रदेशमधून आला फोन

Akon Video: धक्कादायक! भर कॉन्सर्टमध्ये प्रसिद्ध गायकाची टवाळखोरानी काढली पॅन्ट, VIDEO व्हायरल

Diabetes Care: डायबेटीजच्या रुग्णांनी कांदा खाणं योग्य? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Relationship Tips: पार्टनरकडे या गोष्टी सुद्धा मागाव्या लागतायत? तर हेच आहेत ब्रेकअपचे संकेत

Shocking News : "तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात..." जादूटोण्याच्या नावाखाली महिलेवर बलात्कार, नाशिकमधील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT