Shubman Gill Hospitalised: भारताचा कर्णधार शुभमन गिल हॉस्पिटलमध्ये दाखल, नेमकं काय झालंय? महत्वाची अपडेट

Shubman Gill Hospitalised Update : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यादरम्यान तो फलंदाजी करताना अचानक मैदानाबाहेर गेला होता.
Shubman Gill Health Update
Shubman Gill Health Updatesaam tv
Published On
Summary
  • शुभमन गिल कोलकाता येथील रुग्णालयात दाखल

  • कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अचानक गेला होता मैदानाबाहेर

  • मान आखडल्यानंतर तीव्र वेदना होत असल्यानं रुग्णालयात

भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिल याला कोलकाता येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना तो अचानक मैदानाबाहेर गेला होता. त्यानंतर तो पुन्हा मैदानात उतरला नाही. त्याची मान आखडली होती. तीव्र वेदना होत असल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं.

कोलकाताच्या एका रुग्णालयात शुभमन गिल याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याची मान आखडली असून, तीव्र वेदना होत आहेत. त्यामुळे तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केलं. पहिल्या कसोटी सामन्यात तो खेळण्याची शक्यता कमी आहे.

कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानात भारत विरुद्ध आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी तो फलंदाजीसाठी उतरला. सायमन हार्मरने फेकलेला चेंडू स्लॉग स्वीप करण्याच्या प्रयत्नात गिलची मान आखडली. त्यानंतर तो रिटायर्ड हर्ट झाला होता.

शुभमन गिल फक्त तीन चेंडू खेळला होता. दुखापतीनंतर तो मैदानाबाहेर गेला होता. त्यानं अवघ्या चार धावा केल्या. हार्मर याच्या चेंडूवर त्यानं चौकार मारला. पण त्याची मान आखडली. फिजिओ लगेच मैदानात आले. पण तीव्र वेदना होत असल्यानं त्याला मैदानाबाहेर जावं लागलं.

भारतीय संघाचा असिस्टंट कोच मोर्नी मॉर्केल यानं सांगितलं की, गिल याच्या दुखापतीचा आणि त्याचा कार्यभार कुणाकडे सोपवावा याचा काहीही संबंध नाही. गिल खूपच फिट आहे आणि खूप काळजी घेतो. त्याची मान आखडली हे खूप दुर्दैवी आहे. आम्हाला त्यावेळी एका चांगल्या भागीदारीची आवश्यकता होती. पण वेळ खराब होती.

Shubman Gill Health Update
Ind Vs Sa: बुमराहचा 'पंच'! टेस्ट सामन्याच्या पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिका 159 रन्सवर ऑलआऊट

गिलला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी बीसीसीआयने देखील प्रतिक्रिया दिली होती. शुभमन गिलची मान आखडली आहे. बीसीसीआयची मेडिकल टीमच्या देखरेखीखाली तो आहे. त्यात काही सुधारणा झाल्यास तो खेळू शकेल की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल, असे बीसीसीआयने म्हटले होते.

Shubman Gill Health Update
Ind vs SA 1st Test : भारताचा दक्षिण आफ्रिकेला जोरदार झटका, वर्ल्ड चॅम्पियन संघाचा तिसऱ्या दिवशीच सुपडासाफ करणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com