IPL Punjab Kings Saam Tv
Sports

IPL Punjab Kings: प्रीती झिंटानं सोडली शाहरूखची साथ; पंजाब किंग्सच्या आयपीएल संघात मोठा उलटफेर

Punjab Kings: इंडियन प्रीमियर लीग २०२४ साठी पंजाब किंग्जच्या संघाने मोठा उलटफेर केलाय. पंजाब किंग्जने त्यांचे पाच खेळाडूंना बाहेर केलं आहे. या खेळाडूंमध्ये फिनिशर खेळाडूंचाही समावेश आहे. संघ मालकाच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसलाय.

Bharat Jadhav

IPL Punjab Kings Retention And Released List:

इंडियन प्रीमियर लीग २०२४ साठी डिसेंबर महिन्यात मिनी लिलाव होणार आहे. आज आयपीएलच्या सर्व फ्रँचायझींनी आपल्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. यात पंजाब किंग्सच्या संघात मोठा उलटफेर झाल्याचं पाहायला मिळत आहे. पंजाबच्या संघाने फिनिशर खेळाडूलाच बाहेरचा रस्ता दाखवलाय. (Latest News)

आयपीएलच्या इतिहासात पंजाब किंग्जला एकदाही आयपीएलचं विजेतेपद मिळवता आलेले नाही. पंजाब किंग्जचा संघ २०१४ मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता, मात्र कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान आयपीएलच्या २०२४ च्या लिलावापूर्वी संघात मोठी उलटफेर झालीय. पंजाब किंग्जने त्यांचे पाच खेळाडूंना बाहेर केलं आहे. या पाच खेळाडूंमध्ये ९ कोटी रुपये मानधन घेणाऱ्या फिनिशर खेळाडूचाही समावेश आहे.

पंजाबच्या संघाने पाच खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवलाय. यात संघाचा फिनिशर शाहरुख खानचा देखील समावेश आहे. शाहरुखला पंजाब किंग्ज संघात घेण्यासाठी तब्बल ९ कोटी रुपये मोजले होते. यामुळे इतक्या महागड्या आणि फिनिशरची भूमिका बजावणाऱ्या शाहरूखला बाहेर करण्याचा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक होता. भानुका राजपक्षे, मोहित राठी, बलतेज धांडा, राज अंगद बावा आणि शाहरुख खान, या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवलाय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

असं आहे आयपीएलमधील कामगिरी

शाहरूख खानने आयपीएलमध्ये एकूण ३३ सामने खेळले आहेत. यात ४२६ धावा त्याने केल्या आहेत. यातील शाहरुखची सर्वात्तम खेळी ४७ धावांची होती. आयपीएल २०२३ मध्ये त्याने एकूण १४ सामने खेळले असून यात त्याने १५६ धावा केल्या आहेत. तर शाहरूखने त्याच्या आयपीएलच्या करिअरमध्ये आतापर्यंत २८ षटकार मारलेत.

पंजाब किंग्जच्या संघाने कायम ठेवलेले खेळाडूं

शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, हरप्रीत भाटिया, जितेश शर्मा, शिवम सिंग, अथर्व तायडे, सिकंदर रझा, ऋषी धवन, हरप्रीत ब्रार, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस , कावरप्पा .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT