युद्धात ग्रॅव्हिटी बॉम्ब विध्वंस घडवणार? अमेरिकेचे सर्वात घातक अण्वस्त्र

Pentagon Nuclear Warning During US Iran Conflic: अमेरीका-इस्त्राईल आणि इराण मध्ये घमासान युद्ध सुरु असतानाच अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाने गंभीर इशारा दिलाय. अमेरिकेच्या सर्वात घातक अण्वस्त्राची त्यांनी आठवण करुन दिली आहे. जगाला हादरवणारा 'ग्रॅव्हिटी बॉम्ब' काय आहे?
A representational image of the B61-13 gravity bomb highlighting America’s nuclear deterrence capability
A representational image of the B61-13 gravity bomb highlighting America’s nuclear deterrence capabilitySaam Tv
Published On

अमेरीका आणि इस्त्राईलसमोर इराण झुकत नाही. युद्धाच्या सहा दिवसांपासून इराण शत्रूराष्ट्राला तोडीस तोड उत्तर देत आहे. इस्त्राईलची राजधानी तेल अवीव आणि आखाती देशातील अमेरीकेच्या तळांवर क्षेपणास्त्र हल्ला सुरुच आहे. या पार्श्वभूमिवर अमेरीकचे संरक्षण मुख्यालय पेंटागॉनचे प्रमुख पीट हेगसेथ यांनी इराणविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाबाबत अत्यंत आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. अमेरिकेची लष्करी मोहीम अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. असं सांगत अमेरिका गुरुत्वाकर्षण बॉम्बचा वापर करु शकते, असा इशाराही त्यांनी दिलाय.

गुरुत्वाकर्षण बॉम्ब म्हणजेच B61-13 ग्रॅव्हिटी बॉम्ब कसं काम करतो ते पाहूया...

जगाला हादरवणारा ग्रॅव्हिटी बॉम्ब

एका B61-13 ची उत्पादन क्षमता 360 किलो टन पर्यंत असते.

या बॉम्बला फ्री-फॉल अणुबॉम्ब असेही म्हणतात. विमानातून टाकण्यात येणारा दिशाहीन बॉम्ब आहे. क्षेपणास्त्रांप्रमाणे हा बॉम्ब गुरुत्वाकर्षणावर आणि विमानाच्या गतीवर अवलंबून असतो एकदा सोडल्यानंतर ते केवळ गुरुत्वाकर्षणाच्या बळावर लक्ष्याकडे पडतात. 1945 मध्ये अमेरीकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा 24 पट शक्तिशाली हा बॉम्ब आहे.

चीन, रशिया आणि मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे अमेरिकेने गेल्या काही वर्षांत ग्रॅव्हिटी बॉम्बच्या निर्मितीकडे लक्ष दिलं होतं. B61-13 हे दशकांमधील सर्वात घातक अण्वस्त्र आहे. बहुतेक ग्रॅव्हिटी अणुबॉम्ब हे थर्मोन्यूक्लियर असतात. युरेनियम 235 किंवा प्लुटोनियम 239 या पदार्थांचा वापर करुन प्रचंड स्फोट निर्माण करण्याची शक्ती त्यांच्यात असते. B61-13 चा वापर केला तर काय होईल? ते पाहूया...

ग्रॅव्हिटी बॉम्बचा विध्वंस किती?

तज्ज्ञांचा अंदाज आहे, की बीजिंगसारख्या शहरावर हल्ला झाल्यास 7 लाख 88 हजार लोक तात्काळ मारले जाऊ शकतात. तर 2 दशलक्ष लोक जखमी होऊ शकतात. त्याशिवाय हजारो लोक रेडिएशनच्या संपर्कात येऊ शकतात. दोन मैलांच्या परिघात वाचलेल्यांना किरणोत्साराचा त्रास होईल आणि काही काळात त्यांचा कर्करोगाने मृत्यू होऊ शकतो.

एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत अमेरिका आणि इस्रायल सैन्याचे इराणच्या आकाशावर पूर्ण नियंत्रण असेल असा दावा पेंटागॉनचे प्रमुख पीट हेगसेथ यांनी केलाय.मात्र भारतासह अनेक देशांना शांतता हवी आहे. जगाच्या मध्य पूर्व भागातील युद्ध थांबावे आणि अमेरिकेवर विध्वंसकारी ग्रॅव्हिटी बॉम्ब टाकण्याची वेळ येऊ नये, अशीच अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com